मोदी सरकारची मोठी घोषणा, आजपासून मोफत लसीकरण मोहिम सुरु

देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत लसीकरणााची घोषणा केली. ते म्हणाले की, २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून सरकार १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाचे मोफत लसीकरण करणार आहे. त्यामुळे आजपासून मोफत लसीकरण मोहिमेची सुरुवात होत आहे.
मोदी सरकारची मोठी घोषणा, आजपासून मोफत लसीकरण मोहिम सुरु
मोदी सरकारची मोठी घोषणा, आजपासून मोफत लसीकरण मोहिम सुरुSaam Tv
Published On

नवी दिल्ली - आज २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून देशात १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे मोफत कोरोना Corona लसीकरण करण्यात येणार आहे. देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी मोफत लसीकरणााची घोषणा केली. ते म्हणाले की, २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून सरकार १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाचे मोफत लसीकरण Free vaccination करणार आहे. त्यामुळे आजपासून मोफत लसीकरण मोहिमेची campaign सुरुवात होत आहे. Free vaccination campaign starts from today

नवीन लसीकरण मोहिमेत १८ ते ४४ वयोगटातील नागरिक आता लसीकरण केंद्रात जाऊन लस घेऊ शकतात. यापूर्वी नागरिकांना लस घेण्यासाठी CoWIN पोर्टलद्वारे अपॉईंटमेंट घेणे आवश्यक होते. मात्र आता नवीन लसीकरण मोहिमेत १८ ते ४४ वयोगटातील नागरिक थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. या लसीकरण मोहिमेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलेल आणि राज्य सरकारला काहीच पैसे खर्च करावे लागणार नाही आहे. दरम्यान नागरिकांना खासगी रुग्णालयात लस मिळण्यासाठी किंमत मोजावी लागणार आहे.

हे देखील पहा -

कोरोनाची या रोगाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणा मोहिमेची व्याप्ती आजपासून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या मोहिमेसाठी मुंबई पालिका सज्ज झाली असून पालिकेने नियोजन केले आहे. लसीकरणासाठी नोंदणी तसेच इतर काही अडचणी येऊ नयेत, म्हणून विशेष लक्ष दिले जात आहे. त्यासाठीच, पहिल्या टप्प्यात ३० ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने १८ ते २९ वर्षांपर्यंतच्या नागरिकांना लस दिली जाणार आहे. Free vaccination campaign starts from today

मोदी सरकारची मोठी घोषणा, आजपासून मोफत लसीकरण मोहिम सुरु
राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक

पालिकेने आठवड्यातील ३ दिवस हे थेट लसीकरणासाठी राखीव ठेवले असून आठवड्यातील सोमवार, मंगळवार, बुधवार या ३ दिवशी कोणतीही नोंदणी न करता नागरिकांना लस घेता येणार आहे. तर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी मात्र नोंदणी करून लस दिली जाणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com