Akola Market Committee
Akola Market Committee जयेश गावंडे
ऍग्रो वन

बाजार समितीत तुरीला हमीभावापेक्षा जास्त दर; ऑनलाइन नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

अॅड. जयेश गावंडे

अकोला - तुरीची खरेदी होणार असून त्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. मात्र बाजार समितीत मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. अकोला (Akola) जिल्ह्यातील सात केंद्रावर केवळ 4 हजार 832 शेतकऱ्यांनीच (Farmer) नोंदणी केली आहे. जिल्ह्यात यावर्षी आधी अतिवृष्टी आणि आता अवकाळी पावसामुळे (Rain) खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये तूर (Pigeon Pea) पिकालाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली.

हे देखील पहा -

दरम्यान, नवीन तूर बाजारात येणे सुरू झाले असून तुरीला शासनाच्या हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहे. शासनाचा हमीभाव हा 6 हजार 300 असून अकोल्यातील बाजार समितीमध्ये तुरीला हमीभावा पेक्षा 300 ते 400 रुपये दर जास्त आहे. गेल्या आठवड्यात अकोला बाजार समितीत तूर सात हजार रुपयांपर्यंत गेली होती. येणाऱ्या काळात तुरीला विक्रमी दर मिळण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान अकोला जिल्ह्यात आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेंतर्गत भारतीय खाद्य निगममार्फत तूरीची खरेदी होणार असून त्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. मात्र जिल्ह्यातील सातही केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. बाजार समितीत चांगला दर आणि नगदी पैसे मिळत असल्याने शासकीय तूर खरेदीला शेतकऱ्यांनी नापसंती दर्शविल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Loksabha: मनधरणी निष्फळ! शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम; नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट?

ICICI Bank : NRI ग्राहकांसाठी ICICI बँकेचा महत्वपूर्ण निर्णय; परदेशातील मोबाईल नंबरवरून भारतात करता येणार UPI पेमेंट

सोनाक्षी सिन्हाच्या 'हिरामंडी'ची चाहत्यांना भुरळ, अभिनयाची होतेय चर्चा

Today's Marathi News Live : मुंबईतील खार दांडा परिसरात शिवसेना भाजपा कार्यकर्ते आमने-सामने

Delhi Metro: अगोदर बाचाबाची मग थेट हातच उचलला; मेट्रोमध्ये जोडप्याचं कडाक्याचं भांडण, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT