Parbhani News Saam tv
ऍग्रो वन

Parbhani News : पावणेसात लाख शेतकऱ्यांना मिळणार ५ हजारांचे अनुदान; कापूस- सोयाबीन ई-पीक पेरा नोंदणी आवश्यक

Parbhani News : परभणी जिल्ह्यात गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन व कापसाला बाजारपेठेत कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले

राजेश काटकर

परभणी : परभणी जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात कापूस व सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. यासाठी कापूस व सोयाबीन पिकांचे ई पीक पेरा नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील सुमारे पावणेसात लाख शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. 

परभणी (Parbhani News) जिल्ह्यात गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन व कापसाला बाजारपेठेत कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. या नुकसानीच्या मोबदल्यात उपाययोजना आखून राज्य शासनाने गतवर्षीच्या (Soyabean Crop) सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यात ज्या शेतकऱ्यांनी इ पीक पेरावर पिकांची नोंदणी केली आहे. त्याच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. 

महिनाभरात मिळणार अनुदान 

परभणी जिल्ह्यात ६ लाख ८६ हजार ९४७ शेतकरी (Farmer) पात्र ठरले असून त्यांचे आधार व बँक खात्याचे संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा, यासाठी त्यांचे वैयक्तिक ना हरकत पत्र गावोगावी कृषी सहायकाच्या माध्यमातून भरून घेतले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पावणे सात लाख शेतकऱ्यांना राज्य शासनाचे पाच हजार रुपयांचे अर्थसाहाय्य येत्या महिनाभरात मिळणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT