Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price : दहा महिने सांभाळलेल्या कापसाची सात हजारांत विक्री; कापसाच्या भाववाढीची प्रतिक्षाच

दहा महिने सांभाळलेल्या कापसाची सात हजारांत विक्री; कापसाच्या भाववाढीची प्रतिक्षाच

राजेश काटकर

परभणी : भाववाढीच्‍या अपेक्षेने शेतकऱ्याने कापूस घरातच ठेवला होता. तब्‍बल दहा महिने घरात सांभाळून ठेवलेला (Cotton) कापूस आता सात हजार रूपये प्रतिक्‍वींटल दराने विक्री करावा लागत आहे. अर्थात बळीराजाची कापूस दरवाढीची (Cotton Price) अपेक्षा ही फोल ठरली आहे. (Tajya Batmya)

यंदाच्या हंगामातील खरिपातील कपाशी लागवड अंतिम टप्प्यात असताना दुसरीकडे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात भरपावसाळ्यात बाजार समितीच्या यार्डात गेल्या खरिपातील कापसाची आवक सुरू आहे. परभणी जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती पुन्हा निराशा लागली आहे. घरात ठेवलेला कापूस आता नाईलाजास्‍तव मिळेल त्‍या दरात विक्रीसाठी काढावा लागत आहे.

आतापर्यंत होती अपेक्षा

नोव्‍हेंबरच्या सुरुवातीला ९ हजार ४०० इतका भाव कापसाला होता. परंतु कापसाच्‍या भावात वाढ होईल व पावसाळ्यात कापसाला योग्य दर मिळेल; अशी अपेक्षा होती. परंतु दहा महिने सांभाळलेल्या कापसाला आता केवळ सात हजारांचा दर मिळत आहे. कापसाच्या भाववाढीची अपेक्षा साफ फोल ठरल्याने शेतकऱ्यांना (Farmer) मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT