Manvat Bajar Samiti Saam tv
ऍग्रो वन

Manvat Bajar Samiti : गतवर्षीच्या तुलनेत सव्वा लाख क्विंटलची आवक वाढली; मानवत बाजार समितीकडून ५ लाख क्विंटल कापूस खरेदी

Parbhani News : गतवर्षीच्या खरीप हंगामात मानवत तालुक्यात एकूण २३ हजार ७६३ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती.

Rajesh Sonwane

मानवत (परभणी) : मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डात कापूस हंगाम २०२३-२४ मध्ये लिलावाद्वारे जुलैपर्यंत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून ५ लाख क्विंटल कपाशीची खरेदी केल्याची नोंद बाजार समितीकडे करण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांना हंगामाच्या शेवटपर्यंत कापूस भाववाढीची अपेक्षा होती. परंतु मिळेल त्या दरातच कापूस विक्री करावी लागली. 

गतवर्षीच्या खरीप हंगामात (Kharip Hangam) मानवत तालुक्यात एकूण २३ हजार ७६३ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. नोव्हेंबरपासून बाजार समितीच्या यार्डात (Bajar Samiti) लिलावाद्वारे कापसाच्या खरेदी  विक्रीला सुरुवात झाली. यात पहिल्या दिवशी कापसाला सरासरी ७ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला होता. यानंतर कापसाच्या दरात 100 ते १५० रुपयांची घसरण दिसून आली. शेतकऱ्यांकडून कापूस भाववाढीची अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र पूर्ण हंगाम झाला तरी कापसाने आठ हजारांचा देखील टप्पा ओलांडला नाही. त्यामुळे शेतकरी निराश झाला.

दरम्यान नवीन खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतीसाठी लागणार खर्च पाहता शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस काढला होता. यावेळी मिळेल त्या दरात कापूस विक्रीस शेतकरी तयार झाला होता. या दरम्यान जुलै महिन्यापर्यंत मानवत बाजार समितीकडून पाच लाख क्विंटल तर सीसीआयकडून २१ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत खरेदी केलेला कापूस अधिक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

IAS Transfer: तुकाराम मुंढेंची २१ वर्षांत २५ वेळा बदली, आता कुठे करण्यात आली नियुक्ती?

पुण्यासह विविध जिल्ह्यात पुढील ३ तासांत पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट', video

psl 2026 : क्रिकेट विश्वात खळबळ, बॉल टॅम्परिंगचा आरोप; फलंदाजावर २ सामन्यांची बंदी

SCROLL FOR NEXT