Soybean Crop  Saam tv
ऍग्रो वन

Parbhani News: सोयाबीनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी संकटात

Parbhani News : सोयाबीनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी संकटात

राजेश काटकर

परभणी : सोयाबीन पिकाची लागवड परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे. परंतु सोयाबीन पिकांवर (Soybean Crop) करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पडला असून उत्पन्नात घट होण्याची भीती वर्तविली जात आहे. यामुळे शेतकरी (Farmer) संकटात सापडला आहे. (Live Marathi News)

परभणी जिल्ह्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्यामुळे पिकांचे पाण्याअभावी भरणपोषण व्यवस्थित झाले नाही. रिमझिम पावसाने थोड्याफार प्रमाणात पिके जगली. मात्र, आता त्यावरही विविध रोग, किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने उभे सोयाबीन वाळत आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास जाताना बघून शेतकरी हवालदिल झाला आहे. या करपा रोगामुळे काही झाडांच्या शेंगा गळून पडत आहेत. तर काही जागीच वाळून जात आहे. 

पंचनाम्याची मागणी 

कोणतेही कीटकनाशक फवारणी केले तरीही फरक जाणवत नाही. त्यामुळे शेतकरी तूर्तास चिंतेत पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी; अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT