Parbhani News Saam tv
ऍग्रो वन

Parbhani News : अतिवृष्टीत सात एकर कापूस उद्ध्वस्त; पाहून शेतकऱ्याला बसला धक्का, कुटुंबावर शोककळा

Parbhani News : परभणी जिल्ह्यात सर्वत्र रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस आभाळ फाटल्यासारखा पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांची सर्वच पिके यात सोयाबीन, कापूस सारखी पिके पूर्णपणे पाण्यात गेली आहेत

राजेश काटकर

परभणी : राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून परभणी जिल्ह्यात देखील अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. अशाच प्रकारे अतिवृष्टीमुळे सात एकर क्षेत्रात लागवड केलेला कापूस उध्वस्त झाल्याचे पाहून शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

परभणी (Parbhani) जिल्ह्यात सर्वत्र रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस आभाळ फाटल्यासारखा पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांची सर्वच पिके यात सोयाबीन, कापूस सारखी पिके पूर्णपणे पाण्यात गेली आहेत. सेलू तालुक्यात देखील प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील हिस्सी येथील विजय कसाब या शेतमजूर शेतकऱ्याचे (Farmer) अतिवृष्टीच्या पावसामुळे सात एकरवरील कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. जमिनीतून अंकुर निघाल्यापासून त्यांची निगा राखत पिकांना वाढविले होते. मात्र पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. हे पाहून शेतकऱ्याला धक्काच बसला. 

जोरदार पाऊस झाल्यानंतर पीक पाहणी करण्यासाठी विजय कसाब हे शेतात गेले होते. मात्र कापूस पिकाचे पूर्णपणे नुकसान झाल्याचे त्यांनी पाहिले. पिकांची पाहणी करून ते घरी परतले आणि त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा जीव गेला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा व भाऊ असा परिवार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT