Wardha, panchnama of soyabean loss saam tv
ऍग्रो वन

Wardha News : पाच दिवसांची डेडलाईन, सोयाबीन नुकसानीचे पंचनाम्यासाठी अधिकारी पाेहचले बांधावर

शासनाचे आदेश प्राप्त होताच वर्धेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha News : सोयाबीनचे झालेल्या नुकसानीची पंचनामे पाच दिवसात पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यानूसार वर्धा जिल्ह्यात महसूल व कृषी विभागाने संयुक्तरित्या पंचनामे करण्यास प्रारंभ केला आहे. (Maharashtra News)

यंदा सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य रोगासह येलो मोजॅक, मुळकूज, खोडकूजचा प्रादुर्भाव झालाय. यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे.

सोयाबीन पिकांचे झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून आर्थिक मदतीची मागणी सगळीकडे केली जातं होती. त्यातच राज्य सरकारने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.

शासनाचे आदेश प्राप्त होताच वर्धेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानूसार कार्यवाहीस प्रारंभ झाला आहे. दरम्यान जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना पाच दिवसात पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महसूल विभागाने कोकण, नाशिक विभाग, धुळे, पुणे, सातारा, सांगली, भंडारा व गोंदिया वगळून इतर ठिकाणी सोयाबीनचे नुकसान झालेल्या भागात विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने संयुक्त पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

यानुसार जिल्ह्यातील येलो मोझॅक, मूळकुज आणि खोडकुज याचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राचे संयुक्त पंचनामे तातडीने करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने बैठक आयोजित केलीय. बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना संयुक्त पंचनामे करण्याच्या सूचना देत पंचनामे करायला सुरवात देखील झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कपडे फाडले, दगड उचलले, लाथा बुक्क्यांचा मारा! किल्ले सिंहगडावर भर पावसात तुफान राडा

भाजपला मोठा धक्का; प्रदेश उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा;राजकीय वर्तुळात खळबळ

कोकण हादरलं ! २२ वर्षीय महिला वनरक्षकाचा घरात आढळला मृतदेह; आंबोली परिसरात खळबळ

पाऊस गायब, पण छत्रीसाठी तुफान गर्दी! भाजप नेत्याच्या उपक्रमाची जोरदार चर्चा; खासगी सुरक्षारक्षक तैनात

Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर मोठा हवाई हल्ला; क्षेपणास्त्र कारखाना उद्धवस्त

SCROLL FOR NEXT