palghar, Chilli Crop
palghar, Chilli Crop saam tv
ऍग्रो वन

Palghar : किडीच्या प्रादुर्भावामुळं पालघरातील मिरची संकटात; उत्पादन घटणार, शेतकरी चिंतेत

रुपेश पाटील

Palghar : पालघर (palghar) जिल्ह्यात डहाणू, पालघर, तलासरी या तालुक्यांमध्ये चार हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर मिर्चीची (chilli crop) लागवड केली जाते. परंतु वातावरणातील बदलामुळे सध्या मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. बहुतांश ठिकाणी मिरची पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

पालघर जिल्ह्यात तिखट मिरचीसह, आचारी मिरची, भोपळी मिरचीचे उत्पादन घेतलं जाते. सध्या मिरचीच्या झाडावर येणाऱ्या थ्रिप्स, माइट्स, व्हाईट फ्लाय किडीच्या प्रादुर्भावामुळं जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळं पालघर जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी चितेंत पडला आहे. (Maharashtra News)

सध्या लाखो रुपये खर्च करून लागवड केलेली मिर्ची संकटात आली आहे. औषध फवारणी करूनही रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने हजारो हेक्टर वरील मिर्चीची लागवड अस्मानी संकटात सापडली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे.

जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मिरची पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मिरची उत्पादनात कमालीच घट हाेणार आहे. परिणामी शेतक-यांना याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Lok Sabha News : 1 मिनिट बाकी असताना उमेदवारी अर्ज मागे घेतला! अनिल जाधवांच्या माघारीनं कुणाला दिलासा?

Honeymoon Dress Ideas: हनिमूनसाठी हटके ड्रेस आयडिया

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा तिढा सुटला

Gadchiroli News Today: नक्षलवाद्यांचा मोठा कट पोलिसांनी उधळला! कुकरमध्ये लपवली होती स्फोटकं

Nashik Loksabha: फक्त १ मिनीट बाकी अन् अखेरच्या क्षणी माघार... बंडखोर अनिल जाधवांमुळे नेते कार्यकर्त्यांची पळापळ; नाशिकमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT