Beed Farmer
Beed Farmer Saam Tv
ऍग्रो वन

कांद्याने केला वांदा! मान्सूनपूर्व पावसाने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

विनोद जिरे

बीड - जिल्ह्यात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने दोन दिवसांपासुन हजेरी लावली आहे. यामुळं कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्याचं (Farmer) होत्याच नव्हत झालं आहे. काही ठिकाणी शेतात काढणीला आलेला कांदा भिजला आहे, तर काही ठिकाणी काढून ठेवलेला कांदा भिजला आहे. यामुळं शेतकऱ्याच मोठ नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीडच्या आष्टी तालुक्यात कडा,डोंगरगण,दादेगाव, घाटपिंपरी, धामणगाव परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धांदल उडाली. कांद्यासाठी केलेला खर्च निघेल की नाही? अशी चिंता आता त्यांना सतावते आहे.

हे देखील पाहा -

भिवाजी पवार या शेतकऱ्याने 3 एकर शेतीत कांदा लावला होता. काढणीला कांदा आला असतानाच अवकाळी पाऊस झाल्याने, शेतकऱ्यांचा कांदा शेतातच सडू लागला आहे. त्यातच एखादा काढण्यासाठी मजूर देखील मिळत नाही व कांद्याला भाव देखील नाही. यामुळे केलेला खर्च देखील निघेल कि नाही ? अशी चिंता भिवाजी पवार यांना सतावते आहे.

तर शेतातील कांदा काढण्यासाठी लावलेल्या मजुरांना देण्यासाठी पैसे देखील नाहीत, काय करावे ? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कांदा लावून आमचा वाटोळ झालं असं म्हणत पवार यांच्या पत्नीने देखील सांगितले. अशीच काही परिस्थिती इतरही शेतकऱ्यांची आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करावी. अशी मागणी होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मंदा म्हात्रे यांनी थेट राजीनामा नाट्यावर केला मोठा खुलासा

Maharashtra Election: नाशिक लोकसभा मतदारसंघात अवघ्या २४ तासात नवा ट्वीस्ट; समता परिषदेने घेतली नवी भूमिका

Benifits of Guar: अनेकांना नापसंत असणारी गवार आरोग्यासाठी आहे फायदेशीर

Ratnagiri Sindhudurg : विनायक राऊतांनी नारायण राणेंचा भूतकाळ काढला; अनेक गोष्टी सांगून टाकल्या!

Pimpri Chinchwad News Today: पिंपरी-चिंचवडमध्ये मर्सिडीजमध्ये चक्क 29 लाखांची रोकड आढळून आल्यानं आश्चर्य!

SCROLL FOR NEXT