lightning strike Saam Tv
ऍग्रो वन

दोंदवाडा शेत शिवारात वीज पडून एकाचा मृत्यू, तर एक जण जखमी...

जखमीला उपचारासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिनू गावित

नंदुरबार - शहादा तालुक्यातील दोंदवाडा शेत शिवारात वीज पडून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमीला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. शहादा तालुक्यातील फेस येथील रहिवासी अर्जुन पाटील यांचे शेत (Farm) शहादा तालुक्यातील दोंदवाडे येथे असलेल्या शेतात सायसिंग तडवी (वय २५ वर्षे) हा कुटुंबासह शेतात एका छोट्या झोपडीत राहत होता.

हे देखील पाहा -

शहादा तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात सायसिंग तडवी, पत्नी ईमा, सासू रतनी व शेतमजूर ईश्वर हे शेतात असलेल्या झोपडीत थांबलेले असताना मोठा आवाज होऊन परिसरात वीज पडल्याने सायसिंग यांचा जागीच मृत्यू झाला. शेतमजूर ईश्वर जखमी झाले आहे. जखमीला उपचारासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पत्नी ईमा तडवी व सासू रतनी गोमता पाडवी हे काही काळ बेशुद्ध होते. ते शुद्धीवर आल्यावर त्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. पावसामुळे घटनास्थळी जाण्यात अडथळा येत असल्याने नातेवाईकांनी लाकडी दांडीला झोळी बांधून रस्त्यावर आणले. मंडळाधिकारी विजय सावळे, तलाठी महेश ठाकरे, निलेश मोरे यांनी पंचनामा केला. तसेच सारंखेडा पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान कोळी यांनीही पंचनामा करून मयत सायसिंग तडवी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान, मयताच्या वारसांना मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT