सोलापूर जिल्ह्यात अद्याप पीक पंचनाम्याचा आदेश नाही...
सोलापूर जिल्ह्यात अद्याप पीक पंचनाम्याचा आदेश नाही... विश्वभुषण लिमये
ऍग्रो वन

सोलापूर जिल्ह्यात अद्याप पीक पंचनाम्याचा आदेश नाही...

विश्वभुषण लिमये

सोलापूर - सांगली आणि अहमदनगर प्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील फळबागांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. सांगली आणि अहमदनगर मधील नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत.मात्र, आठवडा उलटला तरी अद्याप पंचनामे सुरू झाले नाहीत. द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे शेती पिकांच्या पंचनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

तसेच ठोस मदत करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. मागील तीन वर्षापासून द्राक्ष बागायतदार मोठ्या अडचणीत आहेत. चालू हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

द्राक्ष बाग जोपासण्यासाठी एकरी 3 लाखाचा खर्च येतो आणि जवळपास तो खर्च झालेला असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला आहे. द्राक्षवर अवलंबून असणारे शेतमजूर ते औषध विक्रेते या सर्वांवर याचा परिणाम होणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने ठोस मदत करावी अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाने केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Bank Robbery | ICICI होम फायन्सास कंपनीच्या शाखेत चोरी,लॉकरमधील 5 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला

Jalgaon Crime News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला झोपेतच संपविले; आरोपी पती ताब्यात

Strong Bones : हाडांच्या मजबूतीसाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा; सांधे दुखी होईल छुमंतर

Shantigiri Maharaj Nashik News | नाशिकमधून गावितांनी घेतली माघार, शांतिगिरी अजूनही ठाम

ED Raid: मंत्र्याच्या PA कडे सापडलं कोट्यवधींचं घबाड; पैशांचा नुसता ढीग, नोटा मोजून ईडी अधिकारीही थकले

SCROLL FOR NEXT