Nashik News Saam Tv
ऍग्रो वन

नाशकात कोथिंबिरीला सोन्याचा भाव; लिलावात एका जुडीला तब्बल 190 रुपये!

नाशिक बाजारसमितीत कोथिंबिरीचे भाव कमालीचे कडाडले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक - कोणतीही भाजी असो की बिर्यानी असो किंवा चैपाटीवर मिळणारी भेळ असो, या सर्व पदार्थांची चव वाढते ती कोथिंबिरीमुळे. सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कोथिंबिरीचा वापर हा होतचं असतो. आज हीच कोथिंबिर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती तिच्या वाढलेल्या किंमतीमुळे. सध्या नाशिकच्या (Nashik) बाजारात कोथिंबीरीला सोन्याचा भाव आला आहे.

नाशिक बाजारसमितीत कोथिंबिरीचे भाव कमालीचे कडाडले आहेत. लिलावामध्ये कोथिंबिरीला शेकडा १९ हजार रुपये भाव मिळाला आहे. म्हणजेच कोथिंबिरीची प्रत्येकी एका जुडीला तब्बल १९० रुपये इतका विक्रमी भाव मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतातला माल मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. त्यामुळे बाजारात कोथिंबिरीची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने त्याचा परिणाम कोथिंबिरीच्या भावावर झाला आहे. सध्या बाजारात कोथिंबिरीला सोन्याचा भाव आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशकात सातत्त्याने पाऊस बरसतोय. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचत असल्यानं अन्य भाज्यांप्रमाणे कोथिंबीर पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. उत्पादन घटल्याने मागील २ आठवड्यापासून कोथिंबिरीचे भाव वाढायला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात १० ते १२ हजार रुपये शेकडा, त्यानंतर २ दिवसांपूर्वी १६ हजारांवर पोहचलेल्या भावानं आता १९ हजारांचा उच्चांकी दर गाठला आहे. येत्या काळात कोथिंबिरीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याने कोथिंबीरीचा जपून वापर करा.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही या ५ गोष्टी करू नका; अन्यथा...

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट्र '

पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून वाद टोकाला गेला; ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT