Onion Price Saam tv
ऍग्रो वन

Onion Price: कांदा करतोय शेतकऱ्यांच्या वांदा; भाव नसल्याने शेतकरी नाराज

कांदा करतोय शेतकऱ्यांच्या वांदा; भाव नसल्याने शेतकरी नाराज

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : राज्‍यात कुठेही कांद्याला बाजार समितीत चांगला दर मिळत नाही. हीच परिस्‍थीती नंदुरबारमध्‍ये असून नंदूरबार (Nandurbar) बाजारात कांद्याला रास्त भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या (farmer) डोळ्यात पाणी आणले आहे. यामुळे कांद्याने चांगलाच वांदा केला आहे. (Maharashtra News)

हल्ली बाजारात केवळ चार ते सात रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांनी कांदा पिकांवर केलेला खर्च खर्च देखील निघणार नसल्‍याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा कांद्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा दिली आहे. राज्‍यातील सर्वच बाजार समितींमध्‍ये कांद्याला (Onion) अगदी कवडीमोल भाव मिळत आहे. बळीराजाचा खर्च तर सोडा उलट वरतून पैसे मोजावे लागत असल्‍याचे चित्र सध्‍या बाजारात आहे.

रोजचे चारशे कट्टे

नंदुरबार येथील महात्मा ज्योतिबा फुले बाजारपेठेमध्ये दररोज ३०० ते ४०० कट्टे कांदे विक्रीला दाखल होत आहेत. बाजारात कांद्याला आवक अधिक वाढली आहे. मात्र कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Shave Bhaji Recipe : एक टोमॅटो अन् वाटीभर शेव, रात्रीच्या जेवणाला झटपट बनवा 'हा' पदार्थ

Ashadhi Wari: विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याला अमानुष मारहाण, पंढरपुरात सुरक्षा रक्षकांची मुजोरी|VIDEO

Language Row : मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांची दिलगिरी; मराठी अस्मिता मोर्चाआधीच निर्णय

Amravati News: अमरावतीत बॉम्बची अफवा, 'या' परिसरात शोधमोहीम सुरू, पोलिसांचा मोठा फौजफाटा|VIDEO

Salt Scrub : मीठाचे पाणी त्वचेसाठी चांगले आहे का?

SCROLL FOR NEXT