Bajari Price Update Saam TV
ऍग्रो वन

Bajari Price News: बाजरीच्या दरात ६०० रुपयांची घसरण; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Millet Price Fall: नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी बाजरीचे उत्पन्न घेतला जात असते. सध्या उन्हाळी बाजरी कापणी तसेच मळणीचे काम सुरू आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : उन्हाळी बाजरी काढणीच्या कामाला वेग आला आहे. बाजरी काढणी केल्यानंतर शेतकरी विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जात आहे. मात्र शेतकऱ्याच्या घरात बाजरी आल्यानंतर बाजरीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकऱ्याला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी बाजरीचे उत्पन्न घेतला जात असते. सध्या उन्हाळी बाजरी कापणी तसेच मळणीचे काम सुरू आहे. मात्र नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरीचे दर क्विंटल मागे ५०० ते ६०० रुपयांनी कमी झाले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर खरीप हंगामसाठी शेतकऱ्यांना नाईलाजाने बाजरी कमी भावात विक्री करावी लागत आहे. आवक कमी असूनही दर कमी झाल्याने शेतकरी (Farmer) चांगलेच आर्थिक संकटात सापडले आहे. 

उत्पादनातही घट  

पंधरा दिवसांपूर्वी बाजरीचे दर २६०० ते २७०० रुपये प्रती क्विंटल होता. मात्र, गेल्या पाच ते सात दिवसांपासून बाजरीला २१०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. एकरी १८ ते २२ क्विंटल येणारी बाजरी (Bajar Samiti) यावर्षी पाण्याच्या कमतरतेमुळे केवळ १० ते १२ क्विंटल आली आहे. यात क्विंटल मागे ५०० ते ६०० रुपये दर कमी झाले असून केवळ २१००  ते २२०० रुपये प्रतिक्विंटल दराने बाजरी विकली जात आहे. या दरात एकरी लावलेले भांडवलही निघत नसून शेतकऱ्यांना नाईलाजाने कमी भावात बाजरी विक्री करावी लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Potholes: खड्ड्यात नेऊन ठेवलाय महाराष्ट्र; महानगरांमध्ये रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

BMC: सहा महिन्यांत नव्या गाड्या, BMCत उधळपट्टी; पदाधिकाऱ्यांना स्कॉर्पिओ नको, इनोव्हा हवी

NDA प्रवेशासाठी दिल्लीत भेटीगाठी? अमित शाहांनंतर सुनील तटकरे मोदींना भेटले

Accident: सोलापूर-धुळे महामार्गावर साईभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू,२० जण जखमी

पार्थ पवार- कायनात दारा यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा खास Photos

SCROLL FOR NEXT