Drones Spraying Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Drones Spraying: ६ मिनिटात १ एकर क्षेत्रावर फवारणी शक्य; नंदुरबारात औषध फवारणीच्या ड्रोनची निर्मिती

६ मिनिटात १ एकर क्षेत्रावर फवारणी शक्य; नंदुरबारात औषध फवारणीच्या ड्रोनची निर्मिती

दिनू गावित

नंदुरबार : पिकांच्या फवारणीसाठी मजुरांचा तुटवडा गावागावात भासत आहे. भेटलेच तरी रासायनिक खतांचे (Fertilizer) दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर जाणवत आहेत. पाठीचे आजारही बळावले आहेत. या परिस्थितीत बिगफ्लाय एयरक्राफ्ट इंजिनीअरींग कंपनीचे पहिले मॉडेल ब्ल्यु बर्ड वी-10 मार्केटमध्ये येण्यासाठी आता सज्ज झाले आहे. (Nandurbar Farmer News)

ड्रोनची निर्मिती नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातच करण्यात आली असून हे ड्रोन स्वयंचलित व अत्याधुनिक बनावटीचे आहे. याची पूर्ण सेवा नंदुरबारमध्येच (Nandurbar News) उपलब्ध आहे. म्हणून परिसरातील शेतकरी (Farmer) बांधवांमध्ये ड्रोनविषयी कुतूहल व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बिगफ्लाय एयरक्राफ्टच्या शेतातील औषध फवारणी (अग्रिकल्चर सोइंग) ड्रोनचे संपूर्ण भारतात तसेच दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात निर्यातची लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. दिवसाला एका ड्रोनद्वारे ४० ते ६० एकर फवारणी करणे सहज शक्य असल्‍याचे मत बिगफ्लाय एयरचे संस्थापक सुजीत वर्टी व को फौंडर मयूर सूर्यवंशी यांनी दिली आहे.

दहा लिटरची टँक

१० जानेवारी २०१२ च्या नव्या ड्रोन धोरणानुसार शासनाने ४० ते १०० टक्‍के एवढी भरभक्कम रक्कम सब्सिडी म्हणून घोषित केली आहे. तरी राज्यातील शेतकरी निर्माते कंपन्या, सहकारी संस्था, कृषी विज्ञान केंद्र कृषी पदवीधर यांना लाभ घेता येईल. ड्रोनमध्ये दहा लिटर टॅंक बसविण्यात आली आहे. सहा मिनिटांमध्ये एक एकर क्षेत्रावर फवारणी करणे सहज शक्य होणार आहे. याव्यतिरिक्त ड्रोनद्वारे फवारणीमुळे 95 टक्के पाण्याची व 40 टक्के औषधाची बचत होणार असल्‍याची माहिती मयूर सूर्यवंशी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT