Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : दुर्गम डोंगरावर फुलविली आंब्याची बाग; आदिवासी दांपत्याने साकारला उत्‍पन्‍नाचा मार्ग

दुर्गम डोंगरावर फुलविली आंब्याची बाग; आदिवासी दांपत्याने साकारला उत्‍पन्‍नाचा मार्ग

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील अति दुर्गम गाव रावलापानी येथील सुशिक्षित आदिवासी युवक रतिलाल कामा पवारा व त्याची पत्नी आशा रतिलाल पवारा या दांपत्याने डोंगर उतारावरील कोरड्या (Nandurbar) खडकाळ जमिनीवर सेंद्रिय केसर आंब्यांची (Mango) उत्तमरीत्या बाग फुलवून उत्पन्नाचा मार्ग साकारला आहे. सोबत कोरड्या जमिनीत वनराई फुलवून परिसरही हरित केला आहे. (Maharashtra News)

नंदुरबारमधील सातपुडा पर्वताच्या पहिल्या रांगेतील अतिदुर्गम भागातील रावलापाणी येथे पिढ्यानपिढ्या दारिद्र्यात वास्तव्याला असलेल्या आदिवासी कुटुंबातील रतिलाल पवारा या युवकाला बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर चरितार्थासाठी रोजगार तर हवा होता. मात्र ज्या दुर्गम व अतिमागास गावात त्याने जन्म घेतला. त्या भागाचा विकास व्हावा हा त्याचा ध्यास होता. या परिसरात काही प्रमाणात गावरान आंब्यांची झाडे आहेत. मात्र डोंगरावरची पारंपारिक शेती करून त्याला हे ध्येय गाठता येणे शक्य नव्हते. परिणामी शिक्षण व आपल्यातील कौशल्याचा वापर करून पत्नीच्या मदतीने त्याने डोंगरावर आधुनिक पद्धतीने आंब्याची बाग फुलविण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्याला साथ मिळाली नाबार्डच्या माध्यमाने शासनाच्या रोजगार हमी योजनेच्या आर्थिक मदतीची आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची.

५०० रोपांची केली लागवड

डोंगर उताराची खडकाळ जमिनीवर फळ बाग लावणे शक्य नव्हते. मात्र दांपत्याने स्वतः अहोरात्र अथक परिश्रम करून ही जमीन तयार केली. सन २०१६ मध्ये त्यांना कृषी विभागामार्फत रोपे मिळाली. तर २०१७ मध्ये तळोदा येथील ल्युपिन वेल्फेअर अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमाने वाडी प्रकल्प अंतर्गतही त्यांना अस्सल वाणाच्या केसर आंब्याची रोपे मिळाली. विशेष म्हणजे या परिसरात त्यावेळी रस्ते नसल्याने या दांपत्याने सुमारे पाच किलोमीटर डोंगरवाटेची पायपीट करून डोक्यावर रोपे शेतापर्यंत नेली. सुमारे चार एकर उताराच्या जमिनीत सुमारे ५०० रोपांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केली. यासाठी रतिलाल पावरा यांनी कृषी विज्ञान केंद्रातून आवश्यक प्रशिक्षण घेतले आहे.

डोक्‍यावर वाहिले पाणी

परिसर अगदीच कोरडा असल्याने पावसाळा वगळता पाण्याची कोणतीच सोय नव्हती. मात्र गावातील नाल्यात काही प्रमाणात पाणी असल्याने प्रथम एक वर्ष डोक्यावर हंडी घेऊन डोंगर चढून रोपांना पाणी दिले गेले. नंतरच्या काळात डीझेल पंप लाऊन सिंचन केले. २०१८ मध्ये गावात वीज जोडणी आल्यानंतर विजेच्या पंपाने पाणी डोंगरावर चढविले गेले. पाण्याचा कमी वापर व्हावा; म्हणून २०१९ मध्ये प्रधानमंत्री सिचन योजनेचा लाभ घेऊन ठिंबक सिंचनाचे संच बसविण्यात आला. कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता अस्सल सेंद्रिय खतांचा वापर केला गेला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT