Onion Crop Saam tv
ऍग्रो वन

Onion Crop : कांदा पिकावर किडी रोगाचा प्रादुर्भाव; सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा फटका

Nandurbar News : शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांडा लागवड केली आहे. याचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता असताना वातावरणात होत असलेल्या बदलामुळे कांद्यावर याचा परिणाम होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : हवामानात सातत्याने बदल होत असल्याने पिकांवर त्याचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने हवामानात बदल होत असल्याने रब्बी हंगामातील कांदा पिकांवर (Onion Crop) किडी रोगाच्या प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता औषधी फवारणी करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

शेतकऱ्यांनी (farmer) रब्बी हंगामातील कांडा लागवड केली आहे. याचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता असताना वातावरणात होत असलेल्या बदलामुळे कांद्यावर याचा परिणाम होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. हवामानातील बदलाचा फटका कांदा पिकावर होत असल्याने शेतकऱ्यांना आता पुन्हा फवारणी करण्यात येत असल्याने कांदा पिकावर अधिक खर्च केला जात आहे. कांद्याला चांगला भाव मिळाला तर तो परवडणारा आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परंतु कांद्याला योग्य भाव मिळणार का? असा देखील प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे. कांद्याला एकरी खर्च अधिक वाढला असल्याने शेतकऱ्यांना आता अधिक पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे कांद्यावर केलेल्या खर्च निघून दोन पैसे खिशात राहावा अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Death: दिव्यांका सिरोहीनंतर आणखी एक ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: पंढरपूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला मारहाण

BPCL Recruitment: भारत पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी; पगार मिळणार १.४ लाख रुपये; आजच करा अर्ज

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं १२००० रुपयांनी झालं स्वस्त, 18K, 22K आणि 24K चे आजचे दर किती?

Bad Skin Habits: रोजच्या 'या' 4 सवयींमुळे त्वचा होतेय खराब, वेळीच द्या लक्ष, नाहीतर दिसाल म्हातारे

SCROLL FOR NEXT