Cotton Crop Saam tv
ऍग्रो वन

Cotton Crop : कापूस उत्पादक शेतकरी अडचणी; कापसावर मावा, तुडतुडे, पांढरी माशीचा प्रादुर्भाव

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात वातावरणातील होणाऱ्या बदल आणि गेल्या पंधरवड्यापासून असलेल्या ढगाळ वातावरणाचा फटका कापूस पिकाला बसताना दिसून येत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : एकतर सततच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता मागील आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र कापूस उत्पदक शेतकरी अडचणीत सापडला आहे. ढगाळ वातावरणानंतर अचानक कडक ऊन पडत असल्याने कापसाच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे पीक खराब होत आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात वातावरणातील होणाऱ्या बदल आणि गेल्या पंधरवड्यापासून असलेल्या ढगाळ वातावरणाचा फटका कापूस पिकाला बसताना दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास एक लाख पंचवीस हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर (Cotton Crop) कापसाची लागवड करण्यात आली आहे. ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप यामुळे कापसावर पांढरी माशी, मावा तुडतुडे यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. तर काही भागात रस शोषणाऱ्या अळीचा ही प्रादुर्भाव दिसून येत असल्याने अडचणीत वाढ झाली आहे.  

महागड्या औषधांची फवारणी 

कपाशीवर पडलेल्या मावा, तुडतुडे आणि रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी (Farmer) मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा फवारणी करत आहे. कृषी विभागाने संबंधित किडीच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT