Nandurbar News
Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News: पहिल्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाले नसतानाच दुसऱ्यांदा संकट; नैसर्गिक संकटाने शेतकरी उध्वस्त

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाले असून रब्बी हंगामातील पिके मोठ्या प्रमाणात भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांना (Farmer) मोठा फटका बसला आहे. यात दहा दिवसात दुसऱ्यांदा झालेल्‍या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (Tajya Batmya)

सोमवारी रात्री (Nandurbar) नंदुरबार, नवापूर, तळोदा आणि शहादा तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने काढण्यासाठी आलेला हरभरा, गहू, रब्बी ज्वारी, टरबूज, खरबूज, केळी, पपई आणि मिरची पिकाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. दरम्‍यान दहा दिवसांपुर्वी झालेल्‍या गारपीट व पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनाम अद्याप पुर्ण झालेले नसताना दुसऱ्यांदा संकट उभे राहिले आहे.

लाल मिरचीचेही नुकसान

शेतकऱ्यांसोबतच नंदुरबारमधील मिरची व्यापाऱ्यांनाही आवकाळी पावसामुळे मोठा आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असल्याचे चित्र आहे. नंदुरबार बाजार समितीमध्ये खरेदी केलेली मिरची अवकाळी पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nigeria Bomb Blast: प्रॉपर्टीच्या वादातून प्रार्थनास्थळात बॉम्बस्फोट; ८ जणांचा मृत्यू, १६ जखमी

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

SCROLL FOR NEXT