Nandurbar Unseasonal Rain Saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे ४ एकरातील केळी मातीमोल; लाखो रुपयाचा खर्च वाया

Nandurbar News : नवापूर तालुक्यात काढणीला आलेल्या भात शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
 : अवकाळी पावसाने नंदुरबार जिल्ह्याला झोडपून काढले आहे. यातच केळी उत्पादक शेतकऱ्यांचे (Farmer) मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. यात लाखो (Nandurbar) रुपयांचा खर्च करून पिकवलेली ८ हजार केळीचे खोड जमिनीला ठेवले आहेत. (Breaking Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात रविवारी दुपारपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला असून नवापूर तालुक्यात काढणीला आलेल्या भात शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. याच दरम्यान तळोदा तालुक्यातील मोड शिवारात लागवड केलेली केली अवकाळी वादळी पावसाने (Rain) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एका महिन्याने तोडणीला आलेली केळी पीक जमीनदोस्त केले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकरी जगदीश काशिनाथ चौधरी यांनी आपल्या शेतात मार्च महिन्यात ४ एकरात केळी पिकाची लागवड केली होती. मोठ्या मेहनतीने ८ हजार ५०० खोडांची लागवड करून संगोपन केले. त्यावर रासायनिक खते, कीटनाशकांचा वापर करून लाखोंचा खर्च केला. परंतु झालेल्या अवकाळी वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन एका महिन्याने तोडणीला आलेली केळी पीक जमीनदोस्त केले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची, ४ महिन्यापासून सिडकोची सोडत काढली नाही

Shocking : ७ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नामांकित मॉलच्या बेसमेंटमध्ये आरोपीचं भयंकर कृत्य

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

वजन कमी करण्यासाठी प्या मेथी आणि सब्जाचे पाणी, १५ दिवसांत कमी होईल पोटावरची वाढलेली चरबी

Solapur: सोलापूर हादरले! पहाटे ट्रेनवर थरारक दरोडा, प्रवाशांना मारहाण; महिलांनाही सोडलं नाही, मोबाईल अन् दागिने लुटले

SCROLL FOR NEXT