Papaya Crop  Saam tv
ऍग्रो वन

Climate Change : वातावरणात सतत बदल; पपई पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, आंब्याचा मोहोरही गळला

Nandurbar Dhule News : कधी ढगाळ वातावरण व अचानक कडक उन्हाचे चटके जाणवत असल्याने याचा परिणाम पिकांवर होत आहे. प्रामुख्याने पपई पिकाला याचा फटका बसत असून आंबा मोहोर गळून पडल्याने नुकसान

Rajesh Sonwane

सागर निकवाडे/ भूषण अहिरे 

नंदुरबार/ धुळे : मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. कडाक्याची थंडी पडल्यानंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील झाला. तर यानंतरही कधी ढगाळ वातावरण व अचानक कडक उन्हाचे चटके जाणवत असल्याने याचा परिणाम पिकांवर होत आहे. प्रामुख्याने पपई पिकाला याचा फटका बसत असून आंबा मोहोर गळून पडल्याने नुकसान होत आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात पपईच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असते. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पपई लागवड केली होती. मात्र जिल्ह्यात अनेक दिवसापासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलावामुळे पपई पिकावर मोझेक व डावनी रोगाचा प्रादुर्भाव पडल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण पपईच्या बागाच धोक्यात आल्याने शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. 

पपईची पाने गळून पडताय 

बदलत्या वातावरणामुळे पपई पिकावर मोझेक रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे पाहण्यास मिळत आहे. या रोगामुळे पपईची पान पिवळी पडुन गडून पडत आहेत. याच्या फटका पपईला देखील होणार आहे. यात शेतकऱ्यांचे देखील नुकसान होत आहे. यामुळे कृषी विभागाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अवकाळीचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका 

धुळे : हवामान बदलाचा फटका मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर आता वातावरणात बदल झाले असून या वातावरण बदलाचा फटका आंब्याच्या मोहरला बसू लागला आहे. आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणात गळाल्यामुळे आंब्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण होणार असल्याने आता याचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. गेल्या वर्षी देखील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हवामान बदलाचा फटका सहन करावा लागला होता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawan Singh Wife: 'मी एक तुच्छ महिला...'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने मागितली आर्थिक मदत, सोशल मीडियावर शेअर केला क्यूआर कोड

लाडकी बहिण योजनेसाठी ekyc कशी कराल ? कोणते कागदपत्रे लागतात?

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांची भावना उद्धव ठाकरे यांना समजली, म्हणून त्यांनी तत्काळ कर्जमाफी केली - ओमराजे निंबाळकर

Customer Alert : सावधान! D-Mart मध्ये महिलांना हेरायचा अन् सोनं-पैशावर डल्ला मारायचा, पोलिसांनी सीरियल स्नॅचर’च्या मुसक्या आवळल्या

Manoj Jaranage Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT