Nanded News Saam tv
ऍग्रो वन

Nanded : अतिवृष्टीमुळे शेतातील पिके मातीमोल; हळद पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान

Nanded News : मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले होते. शेतातील पाणी आता ओसरू लागल्याने पिकांच्या झालेल्या नुकसानीची दाहकता समोर येत असून अर्धापूर तालुक्यात हळद उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या जिल्ह्यातील नदी नाल्यांचा पूर ओसरला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली होते. शेतातील पाण्याचा निचरा झाल्याने आता या शेतीची दाहकता दिसत आहे. 

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात केळी, सोयाबीन या सोबतच हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असते. मात्र मागील दोन आठवडे सततचा पाऊस आणि झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेले होते. अनेक शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यात नांदेड जिल्ह्यात हळद पिकात पाणी गेल्याने हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

हळदीच्या पिकात होते पाच फूट पाणी 

अर्धापूर तालुक्यातील देगाव येथील शिवाजी जाधव या शेतकऱ्याने आपल्या दोन एकरमध्ये हळदीचे पीक घेतलं होतं. हळदीचे पीक चांगल्या स्थितीत असतानाच पावसाने कहर केला. जाधव यांच्या दोन एकर हळदीत पाच फुटापर्यंत पाणी होतं. तब्बल तीन ते चार दिवस हळदीत पाणी साचून असल्याने हळदीचे संपूर्णतः नुकसान झाले आहे. आता या हळदीतील पाणी ओसरल्याने हळद पिकाची दाहकता दिसून येत आहे. 

हळदीसोबत भाजीपाला सडला 

दोन एकर वरती हळद संपूर्ण वाळून गेली. हळद पिकांसोबतच दीड एकर वरील भाजीपाला देखील या पावसामुळे सडून गेला. आता शिवाजी जाधव यांच्या हाती काही लागणार नाही. शासनाने मात्र हेक्टरी साडेआठ हजार रुपयाची आर्थिक मदत दिली आहे. परंतु शेतकऱ्यांची लाखो रुपयांची हळद पाण्यात गेली आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Health: पावसाळ्यात संसर्गाचा सर्वाधिक धोका कोणाला जास्त? डॉक्टरांनी या आजाराच्या रुग्णांसाठी दिला महत्त्वाचा इशारा

क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन

Maharashtra News Live Update: पालघर जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांची पत्रकार परिषद

WhatsApp Ayushman Card : WhatsApp वरूनच बनवा आयुष्मान कार्ड; घरबसल्या फक्त 5 मिनिटांत पूर्ण होईल प्रक्रिया

Ulhasnagar : उल्हासनगर हादरलं! भरदिवसा तरुणाची हत्या; घटना कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT