Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत साडेसात लाख शेतकऱ्यांनीच काढला पीक विमा; योजनेसाठी शेवटचे तीन दिवस

Nanded News : खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर पीक विमा योजना सुरु करून त्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 

नांदेड : सरकारने शेतकऱ्यांसाठी १ रुपयामध्ये शेती पीक विमा योजना सुरु केली आहे. केंद्र व राज्य सरकार मोठ्या प्रमाणात यासाठी आर्थिक तरतूद करत असते. मात्र यंदा शेतकऱ्यांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना नांदेड जिल्ह्यातील केवळ ७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांनीच पीक विमा उतरविला आहे. 

खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर पीक विमा योजना सुरु करून त्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु अजूनही अनेक (Farmer) शेतकरी विमा काढण्यापासून दूर राहिले आहेत. योजनेची प्रभावी अंमलबजावणी लक्षात घेता, प्रत्येक गावागावात यासंदर्भात जनजागृती व्हावी. केवळ १ रुपयामध्ये सेवाकेंद्र, सेतूकेंद्र व बँकेत जाऊन प्रधानमंत्री पिक विमा (Crop Insurance) योजनेचा लाभ घेता येतो. पीक विमा योजनेसाठी १५ जुलै शेवटची तारीख आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याबाबत तातडीने पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बह्राटे यांनी केले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक संरक्षित केले नाही; आशा शेतकऱ्यांनी तातडीने पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत संख्या घटली 

गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ यावर्षी घेतला आहे. यावर्षी ९७ टक्के पाऊस आतापर्यंत (nanded) आला असून पिके संरक्षित करणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी पीक विमा योजनेमध्ये ११ लाख शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. मात्र यावर्षी ११ जुलैपर्यंत ७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांनीच पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेतून नांदेड जिल्ह्यामध्ये ४०० कोटीपेक्षा अधिक लाभ शेतकऱ्यांना झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबई हादरली! १० वर्षाच्या मुलासमोर महिलेवर बलात्कार; गळ्यावर कोयता ठेवून तडीपार गुंडाचं भयंकर कृत्य

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

SCROLL FOR NEXT