Wheat Crop Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News : उच्च शिक्षित तरुणाची अनोखी शेती; ३ एकर शेतात केली गुणकारी खपली गव्हाची लागवड

Nanded News : सेंद्रिय पद्धतीने गव्हाची लागवड करून त्याचे योग्य पद्धतीने नियोजन केले. सध्या गहू चांगल्या स्थितीत असून ४५ ते ५० क्विंटल गव्हाचे उत्पादन होण्याची अपेक्षा भालेराव यांना आहे

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेडच्या कंधार तालुक्यातील एका उच्च शिक्षित तरुणाने आपल्या शेतात गुणकारी खपली गव्हाची (Nanded) लागवड केली. या गव्हाला बाजारात मोठी मागणी आहे. मधुमेह, हाडांचे आजार यासह इतर आजारांवर खपली गहू रामबाण इलाज असल्याचा दावा या तरुण (Farmer) शेतकऱ्याने केला आहे. (Live Marathi News)

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील सूजानवाडी येथील कृष्णा भालेराव या तरुण शेतकऱ्याचे बीएस्सी ऍग्रीपर्यंत शिक्षण झालं आहे. कृष्णा भालेराव याने आपल्या ३ एकर शेतीमध्ये खपली गव्हाची (Wheat) लागवड केली. सेंद्रिय पद्धतीने गव्हाची लागवड करून त्याचे योग्य पद्धतीने नियोजन केले. सध्या गहू चांगल्या स्थितीत असून ४५ ते ५० क्विंटल गव्हाचे उत्पादन होण्याची अपेक्षा भालेराव यांना आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साडेतीन लाख निव्वड नफ्याची अपेक्षा 

खपली गव्हाला बाजारात मोठी मागणी असते. इतकेच नाही तर १० हजार रुपये प्रति क्विंटल दर या गव्हाला मिळतो. खर्च वगळता साडेतीन लाख रुपये निवळ नफा या गव्हाच्या उत्पादनातून मिळणार असल्याचे कृष्णा भालेराव यांनी सांगितले. इतर शेतकऱ्यांनी देखील आपल्या शेतात असे वेगवेगळे प्रयोग करून आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी; असे आवाहन देखील या उच्च शिक्षित तरुणाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dreams Fact : रात्री पडलेलं स्वप्न सकाळी आठवतच नाही? समोर आलं थक्क करणारं कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

Skin Care: चेहरा ड्राय झालाय आणि ओपन पोर्स वाढलेत? मग, चेहऱ्यावर रोज स्प्रे करा हे घरी तयार केलेले फेस मिस्ट

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT