Onion Crop Saam tv
ऍग्रो वन

Onion Crop : कांदा उत्पादकांवर आर्थिक संकट; मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर बिकट प्रश्न

Maval News : मावळ तालुक्यातील पूर्व भागातील तळेगाव दाभाडे, माळवाडी कोटेश्वर, इंदोरी, जांभवडे या भागात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या भागात सध्या शेतकऱ्यांची कांदा पीक काढण्यासाठी लगबग

दिलीप कांबळे

मावळ : रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जात असून आता कांदा काढणीची लगबग सुरु झाली आहे. मात्र कांदा काढणीसाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याचे संकट उभे आहे. कांदा काढणीला उशीर झाल्यास त्याची खराबी होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे आहे. 

मावळ तालुक्यातील पूर्व भागातील तळेगाव दाभाडे, माळवाडी कोटेश्वर, इंदोरी, जांभवडे या भागातील शिवारामध्ये कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या भागात सध्या शेतकऱ्यांची कांदा पीक काढण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र उन्हात मजूर मिळेनासे झाले आहे. शेतीचे काम करण्यासाठी मजुरांची संख्या कमी झाली आहे. कमी क्षेत्र लागवड केलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. 

खर्च आणि उत्पादनाचे मेळ बसेना 

मोठे शेतकरी बाहेरून मजूर आणून आपले काम पूर्ण करत आहेत. त्याचा प्रमाणात मजुरीच्या दरातही मोठी वाढ झालेली आहे. मात्र कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी काय करायचं? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कांदा उत्पादनासाठी दिवसेंदिवस वाढणारा खर्च त्या तुलनेत मिळणारे उत्पादन याचा मेळ बसवणे जिगरीच्या झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचं चित्र सध्या मावळात दिसत आहे.

सध्या कांद्याचे बाजारभाव उतरले आहेत. कांद्याला दहा ते अकरा रुपये किलो मिळतो. कांद्याला किमान २५ ते ३० रुपये किलो मिळणे गरजेचे आहे. खतांचे भाव वाढलेले आहे आणि मजूर मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादन करण्याकरिता शेतकऱ्यांचं दुर्लक्ष होत असताना दिसत आहे. कारण कमीत कमी वीस ते पंचवीस रुपये किलो मागे खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव आता मेटाकुटील आलेला दिसत असल्याचे मत नाना दरेकर यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT