Onions, nashik , Lasalgaon APMC, Rahuri, Farmers, Swabhimani Shetkari Sanghatana, Rasta Roko Andolan saam tv
ऍग्रो वन

Kanda Utpadak Sanghatana News : रडणार नाही लढणार... सरकारच्या डाेळ्यातून पाणी काढणार..; कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक

Maharashtra Rajya Kanda Utpadak Sanghatana: एका रात्रीत कांद्याचा दर वाढला की सरकारने निर्यात बंदी करुन शेतक-यांवर अन्याय केला.

अभिजीत सोनावणे

Nashik News : इतिहासात पहिल्यांदाच नाफेडने लाल कांदा खरेदी केल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी स्वत:च स्वत:ची पाठ थाेपटावून घेतली. परंतु राज्यात नाफेडच्या खरेदीमुळे काेणताही फायदा झालेला नाही. शेतक-यांच्या कांद्याला कवडीमाेल भाव मिळत आहे. त्यामुळे सरकारने ३० रुपये प्रति किलो कांदा खरेदी करावा अन्यथा राज्यभर आंदाेलन छेडले जाईल असा इशारा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने (Maharashtra Rajya Kanda Utpadak Sanghatana) दिला आहे. (Breaking Marathi News)

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे (bharat dighole) म्हणाले नाफेडच्या कांदा खरेदी प्रकारात पुन्हा एकदा गोंधळ उडाला आहे. मागील २ दिवसांपासून नाफेडकडून कांदा खरेदी बंद केली आहे. त्यामुळे शेतक-यांची फसवणूक झाल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.

२ दिवसांपासून कांदा खरेदी न करण्याचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. नाफेडकडून कोणतीही अधिकृत माहिती शेतक-यांना दिली गेली नाही. शेतकऱ्यांना पेमेंट मिळण्यातही अडचणी येऊ लागल्या आहेत. ३१ मार्च अगोदरचं खरेदी ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

दरम्यान दिघाेळे म्हणाले नाफेडने केलेली कांदा खरेदी शेतकऱ्यांच्या फायद्याची नाही. कांदा उत्पादक शेतकरी संभ्रमावस्थेत पडला आहे. सरकारने ३० रुपये किलोने कांदा खरेदी करावा. अन्यथा राज्यभर आंदोलन छेडू.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT