sugar cane  saam tv
ऍग्रो वन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 'या' अॅपच्या माध्यमातून थेट शिवारातून करता येणार ऊसाची नोंदणी

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. ऊस (Sugar Cane) उत्पादक शेतकऱ्यांना ऊस नोंदणीसाठी साखर कारखान्यांकडे खेट्या मारण्याचे प्रकार बंद होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. ऊस (Sugar Cane) उत्पादक शेतकऱ्यांना ऊस नोंदणीसाठी साखर कारखान्यांकडे खेट्या मारण्याचे प्रकार बंद होणार आहे. शेतकऱ्यांना ऊस नोंदीणीसाठी 'महाऊस नोंदणी ' अॅप चालू केले आहे.

सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडून साखर आयुक्तालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच आज सावे यांच्या उपस्थितीत साखर आयुक्तालयात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सदर अॅपप्लिकेशनचा प्रारंभ झाला. सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संचालक प्रशासन उत्तम इंदलकर, संचालक अर्थ यशवंत गिरी देखील यावेळी उपस्थित होते.

ऊस नोंदणीबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ॲपचा वापर होणार आहे. यावेळी सावे म्हणाले, 'काही कारखाने ऊस नोंदी करीत. त्यामुळे अनेक शेतकरी हतबल होतात. त्यानंतर हेच शेतकरी आमच्याकडे येतात. या शेतकऱ्यांच्या मागणीनंतर आम्हाला मध्यस्थी करून नोंदी करून घ्याव्याय लागतात. त्यामुळे या समस्येची जाण आहे. आता 'महाऊस नोंदणी' अॅप उपबल्ध झाल्यामुळे समस्या कायमची दूर होईल. या अॅपचा वापर करताना काही अडचणी सुरुवातीला येऊ शकतात. मात्र, त्या दूर केल्या जातील'.

'महाऊस नोंदणी' अॅपचे उद्धाटन करताना साखर आयुक्त म्हणाले की, 'महाऊस नोंदणी अॅप्लिकेशनमुळे राज्यातील शेतकऱ्यांना नोंदणीचे ऊस नोंदणीचे पूर्ण स्वातंत्र्य प्रथमच मिळत आहे. सुमारे ४० लाख शेतकरी या उपक्रमात आणले गेले आहेत. शेतकऱ्याने एकदा नोंदणी करताच त्याचा ऊस कापून नेण्याची सक्ती आम्ही करणार आहोत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस बिननोंदणीचा किंवा बिगरकापणीचा राहणार नाही'.

मोबाईल अॅप वापरण्याबाबत सूचना

प्ले स्टोरमध्ये जाऊन 'महाऊस नोंदणी' अॅप डाऊनलोड करावे. 'अॅप डाऊनलोड होताच ऊस क्षेत्राची माहिती भरा’ या ठिकाणी बटण दाबावे. त्यानंतर 'ऊस क्षेत्र नोंद करावयाच्या शेतकऱ्याची माहिती' असा भाग दिसू लागेल. त्यामध्ये आपला भ्रमणध्वनी, आधार क्रमांक, पूर्ण नाव टाकावे. त्यानंतर 'पुढे' असे बटण दाबावे.

अॅप डाऊनलोड होताच ऊस क्षेत्राची माहिती भरा' या ठिकाणी बटण दाबावे. त्यानंतर 'ऊस क्षेत्र नोंद करावयाच्या शेतकऱ्याची माहिती' असा भाग दिसू लागेल. त्यामध्ये आपला भ्रमणध्वनी, आधार क्रमांक, पूर्ण नाव टाकावे. त्यानंतर 'पुढे' असे बटण दाबावे.

त्यानंतर 'ऊस लागवडीची माहिती' असा भाग दिसू लागेल. तेथे लागवडीचा प्रकार, उसाची जात, लागवड तारीख नमूद करावी. ऊस क्षेत्र गुंठ्यामध्ये भरावे. त्यानंतर 'पुढे' असे बटण दाबावे.

'ऊस पीक उपलब्ध माहिती कोणत्या कारखान्याला कळवू इच्छिता' असे दिसू लागेल. तेथे तीन कारखान्यांची नावे येतील. त्यात किमान एक व कमाल तीन कारखान्यांची नावे टाकता येतील. ती नमुद करून पुन्हा त्यानंतर 'पुढे' असे बटण दाबावे.

सदर नोंद पूर्ण होताच शेतकऱ्याला 'यानंतर आपणास धन्यवाद' असा संदेश दिसू लागेल. त्यानंतर निवडलेले कारखाने शेतकऱ्याला स्वतःहून संपर्क साधतील. यानंतर 'साखर कारखान्यातील आपली ऊस नोंद पाहण्यासाठी' असा भाग दिसेल. त्याठिकाणी आपण साखर कारखान्यात नोंदविलेला भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवावा. त्यानंतर '

पुढे' असे बटण दाबावे. नोंदणी होताच अॅपमध्ये केलेली नोंद, कारखान्याने स्वीकारलेली नोंद आणि कारखान्याने नाकारलेली नोंद अशी सर्व माहिती शेतकरी पाहू शकतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Almond Milk: बदामाचे दूध प्यायल्यास काय होते?

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

ITBP Recruitment: १२ वी पास तरुणांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिना ९२००० रुपये पगार, अर्ज कसा करावा?

Astro Tips: हातात घड्याळ घालताय? या चुका टाळा अन्यथा...

'ये तुम्हारे कर्मों का फल है...'चाहत अन् रजतमध्ये कडाक्याचे भांडण 'Bigg Boss' मध्ये मोठा ड्रामा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT