Abdul Sattar  Saam TV
ऍग्रो वन

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांच्या पाठपुराव्याला यश; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत

जिरायतीसाठी १३ हजार ६००, बागायतीसाठी २७ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजारांची प्रति हेक्टरी मदत मिळणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यात जून ते ऑगस्ट महिन्या दरम्यान अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे पिकांची आतोनात नुकसान झाले आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने साडेतीन हजार कोटी ७१ लाख २१ हजार रुपयांचा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मंजूर केला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळवून देण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) प्रयत्न करीत होते. आज त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

हे देखील पाहा -

नुकसान भरपाईत तिपटीने वाढ

नुकसान भरपाई देण्याची मर्यादा पूर्वी दोन हेक्टर होती. आता तीन हेक्टर करण्यात आली आहे. पूर्वी जिरायत शेतीसाठी हेक्टरी साडेसहा हजार, बागायत शेतीसाठी हेक्टरी साडेतेरा हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे मदत केली जात होती. तीही फक्त २ हेक्टर पर्यंत दिली जात होती.

आता त्याची मर्यादा ३ हेक्टरपर्यंत वाढविली आहे. तसेच मदतीच्या रकमेतही दुपटीने वाढ केली आहे. आता जिरायत शेतीसाठी १३ हजार ६००, बागायत शेतीसाठी २७ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपयांची प्रतिहेक्‍टरी मदत केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.

या निकषाने मिळणार मदत

राज्यातील ज्या कृषी मंडळात २४ तासात ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस आणि ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय गुरुवारी रात्री काढण्यात आला.

सततची नापिकी त्यात आलेल्या अस्मानी संकट. या सर्व अडचणीतून बळीराजाला बाहेर काढायचे आहे. त्यासाठी आपत्ती प्रतिसाद निधीतून वाढीव मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करीत होतो. शेवटी त्याला यश मिळाल्याने शेतकऱ्याच्या मदतीसाठी खारीचा वाटा का होईना उचलता आल्याने मी समाधानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

SCROLL FOR NEXT