शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराची जागा घेतली कोळप्याने... ओंकार कदम
ऍग्रो वन

शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराची जागा घेतली कोळप्याने...

ग्रामीण भागातही पैशाच्या अभावी बैलांची संख्या कमी होत असल्याने कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने बैलाच्या जागी कोळप्याची शिवाळ शालेय मुलांच्या खांद्यावर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ओंकार कदम

सातारा - जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पाऊस Rain होणारा भाग म्हणून पाटण तालुक्याची ओळख आहे. सध्या पाटण Patan तालुक्यात पावसाने उसंत घेतल्याने पिकांच्या आंतरमशागतीच्या कामाने वेग घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनच्या Lockdown संकटाला बळीराजाला Farmer सामोरे जावे लागल्यामुळे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. पाटण तालुक्यातील ठोमसे गावातील शेतकरी संभाजी नलवडे यांनी शेतीच्या कामासाठी स्वतः च्या शाळकरी मुलांनाच कोळप्याला जुंपले आहे.  

हे देखील पहा -

पाटणच्या खेड्यापाड्यात अजूनही बैल कोळपनीला महत्व आहे. मात्र ग्रामीण भागातही पैशाच्या अभावी बैलांची संख्या कमी होत असल्याने कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने  बैलाच्या जागी कोळप्याची शिवाळ शालेय मुलांच्या खांद्यावर आली आहे. गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत ऑनलाइन शिक्षण सुरू आहे पण अशा दुष्काळी भागात ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईलला रेंज मिळत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.

घरी बसून राहण्यापेक्षा आपल्या वडिलांना शेतीत मदत होईल म्हणून नलवडे बंधूनी बैलाची जागा घेऊन एका दिवसात तब्बल एक एकर जमीन कोळपली आहे. एकीकडे शेतीमध्ये पिकांचे वारंवार नुकसानी मुळे त्रासलेले वडील आणि दुसरीकडे शाळा सुरु नसल्याने शिक्षणा पासून लांब राहावे लागणार मुले असे विदारक चित्र या वेळी पाहायला मिळाले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

Guru Gochar 2025: पुढच्या वर्षी या राशींवर गुरुची राहणार कृपा; अडकलेला पैसा आणि नवी नोकरीही मिळू शकते

Pune News: पुण्यात बिबट्यानंतर माकडांची दहशत, सोसायटीत माकडांची घुसखोरी

SCROLL FOR NEXT