संदीप भोसले
लातूर : लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती बाजारपेठेत (Latur) तुरीचा दर १० हजार २०० रुपये प्रती क्विटल असा भाव मिळत आहे. यामुळे तुर उत्पादक शेतकरी (Farmer) सुखावला आहे. (Maharashtra News)
गतवर्षी अधिक पाऊस झाल्याने तूर पिकाला फटका बसला होता. तुरीचे पीक फलधारणेच्या कालावधीत परतीचा पाऊस झाला. यामुळे लातूर जिल्ह्यात तुरीचा उतारा घटला होता. सध्या मार्केटमध्ये मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने तुरीच्या दरात कमालीची दरवाढ दिसत आहे. यामुळे तुर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.
बळीराजाला हातभार
गतवर्षीच्या खरीप हंगामात लागवड झालेल्या पिक लावडीतून मिळालेल्या उत्पादनातून फारसा फायदा शेतकरीला झाला नाही. त्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शिवाय कपाशीला भाव नसल्याने कपाशी देखील पडून आहे. यामुळे यंदाच्या खरीप हंगामात खत, बियाणे खरेदीची चिंता होती. परंतु, आता तुरीला चांगला दर मिळत असल्याने खरीप हंगामासाठी बळीराजाला मदत मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.