Soyabean Crop Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Crop : सोयाबीन, तुर पीक धोक्यात; पिकांवर कीड आणि उंट अळीचा प्रादुर्भाव वाढला

Latur News : मागील दहा- बारा दिवसांपासून पावसाची संततधार सुरु होती. त्यातच मागील आठवड्यात सतत पावसाची रिपरीप चालू असल्याने पिकांची मशागत पूर्ण होऊ शकली नाही.

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: लातूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी यंदा कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. मागील वर्षी गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाभरातील शेतकरी त्रस्त होते. तर यंदा पिकांचे पान खाणाऱ्या हिरव्या उंट अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. 

लातूर (Latur) जिल्ह्यात यंदा सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. सोबतच तूर पिकाची देखील लागवड करण्यात आली आहे. मागील दहा- बारा दिवसांपासून पावसाची संततधार सुरु होती. त्यातच मागील आठवड्यात सतत पावसाची रिपरीप चालू असल्याने पिकांची मशागत पूर्ण होऊ शकली नाही. यामुळे (Soyabean Crop) सोयाबीनचे पीक पिवळे पडत आहे. तर कीड आणि आळी प्रादुर्भावमुळे सोयाबीनसह तूर पीक धोक्यात आले आहेत. 

शेतकरी संकटात 

सततच्या पावसामुळे (Rain) पिकांवर रोगराई वाढली आहे. यातच सोयाबीन व तुरीवर अळीचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने ते आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी आता फवारणी करू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फवारणीसाठी आर्थिक खर्चाचा सामना करावा लागत आहे. पिकांवर आलीच प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijit Dipke: गांधी, नेहरू आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?

Maharashtra News Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शौर्यभूमीत भारताच्या चाणक्यांचा स्वागत बॅनर काढला

Purandar Fort : पुण्याजवळील ऐतिहासिक पुरंदर किल्ला, 'या' गोष्टी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

महिनाभर रोज न चुकता करा योगा, शरीरात होतील आश्चर्यकारक 5 बदल

Gold Prices Today: आनंदाची बातमी! महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT