Pomegranate Price
Pomegranate PriceSaam tv

Pomegranate Price : डाळिंबाला उच्चांकी दर; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Sangli News : सांगली जिल्ह्यातील जत तालुका पाणी टंचाईने त्रस्त आहे. या दुष्काळी भागात शेती करणे कठीण आहे.
Published on

सांगली : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जत मार्केटमध्ये डाळिंब बाजार मध्ये आज डाळिंब सौद्यात दुष्काळानंतर प्रथमच उच्चांकी दर मिळाला आहे. शेतकरी विशाल कुंभार या शेतकऱ्याने डाळींब मार्केटमध्ये नेले असता त्यास २६५ रुपये इतका दर मिळाला आहे. त्यामुळे दुष्काळी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Pomegranate Price
Ambarnath Crime : अंबरनाथच्या हेरंब मंदिरात चोरी; गणपतीचे तीन किलो चांदीचे दागिने लंपास, चार दानपेट्याही फोडल्या

सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत तालुका पाणी टंचाईने त्रस्त आहे. या दुष्काळी भागात शेती करणे कठीण आहे. यामुळे या भागातील बहुतांश शेतकरी हे कमी पाण्यात जास्त उत्पन्न म्हणून डाळिंबाची लागवड करत त्याचे उत्पादन घेत असतो. या भागातील शेतकऱ्यांचा माल हा चेन्नई, कलकत्ता, मद्रास, मथुराई आदी देशात जतचा (Pomegranate) डाळिंब जात आहे. यामुळे डाळींबाचे उत्पादन घेण्याकडे जात तालुक्यातील शेतकऱ्यांचा (Farmer) अधिक कल असून यातून चांगले उत्पन्न देखील शेतकरी घेत आहे. 

Pomegranate Price
Poshan Aahar : जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थांना मुदत बाह्य पोषण आहार; चौकशीअंती होणार कारवाई

दरम्यान मागील वर्षी डाळिंबाला ७० ते १०० रुपये इतका दर मिळत होता. मात्र आज जतच्या मार्केट मध्ये डाळिंब सौद्यात डाळिंबाला २६५ रुपये इतका दर मिळाला आहे. सध्या डाळिंबाला मागणी वाढली आहे. पण आवक कमी आहे. मागणी वाढल्याने डाळिंबाला दर चांगला मिळत आहे. त्यामुळे डाळींब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com