Soyabean Price Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Price : लातूर बाजारपेठेत सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Latur News : सोयाबीनचे उतपादन घेतल्यानंतर भविष्यात सोयाबीनचे दर वाढतील; या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन घरातच साठवून ठेवले आहे

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची घरात साठवणूक करून ठेवली होती. मात्र सोयाबीनच्या भावात वाढ तर झाली नाही, परंतु सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. लातूरच्या बाजार समितीमध्ये कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

सोयाबीनचे उतपादन घेतल्यानंतर भविष्यात सोयाबीनचे दर वाढतील; या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन घरातच साठवून ठेवले आहे. मात्र वर्ष संपत आले तरी सोयाबीनला चांगला दर (Soyabean Price) मिळत नाही. मात्र चक्क आता सोयाबीन हमीभावापेक्षा कमी ने विक्री होत आहे. तर याकडे बाजार समिती प्रशासनाचे देखील लक्ष नसल्याने शेतकऱ्याच्या अर्थकारणाला मोठा धोका असल्याची चर्चा जिल्हाभरात आहे.

सोयाबीनला प्रति क्विंटल ४ हजार ६०० रुपये इतका हमीभाव असताना लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bajar Samiti) मात्र हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची विक्री होत आहे. दरम्यान शासनाने ठरवून दिलेला हमीभाव लागू तरी कधी होणार? असा  प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी निर्माण झाल्याचं चित्र आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT