Latur News Saam tv
ऍग्रो वन

Soyabean : सोयाबीन खरेदी केंद्राच्या मुदतवाढ बाबत पणन विभागाचे स्पष्टीकरण; केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा

Latur News : मुदतवाढीची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात असून अजूनही केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. मात्र खरेदी केंद्रांच्या मुदतवाढ बाबत पणन महासंघाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: हमीभावात सोयाबीन खरेदी करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या शासकीय नाफेडच्या खरेदी केंद्रांची मुदत संपली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांकडील सोयाबीन पडून आहे. याकरिता मुदतवाढीची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात असून अजूनही केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. मात्र खरेदी केंद्रांच्या मुदतवाढ बाबत पणन महासंघाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

लातूर जिल्ह्यातील जवळपास ४० टक्के शेतकरी आजही सोयाबीन हमीभाव विक्रीपासून वंचित आहेत. खुल्या बाजारातील दर आणि हमीभाव केंद्रावरील दर याच्या मध्ये प्रतिक्विंटल एक हजार रुपयाचा फरक मिळत असल्याने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे किंवा फरकाची रक्कम नोंदणी केलेल्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी; अशी मागणी शेतकरी करत आहेत.

पणन विभागाचे स्पष्टीकरण 

राज्यातील सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रासाठी नियमानुसार ९० दिवसाचा कालावधी देण्यात आलेला होता. मात्र शेतकऱ्याची वाढती मागणी पाहता १३ जानेवारीपासून ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अशी एकूण २४ दिवसाची सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. तर सद्यस्थितीला सोयाबीन खरेदीसाठी कुठलीही मुदतवाढ देण्यात आली नाही; असं स्पष्टीकरण पणन विभागाच्यावतीने देण्यात आलं आहे.

२० हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदीविना पडुन

धाराशिव : शासनाच्या वतीने मुदत संपल्याने ६ फेब्रुवारीपासुन शासकीय हमीभाव खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील ३५ हजार ४०० शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली होती. दरम्यान यातील केवळ १५ हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले. अद्यापही २० हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी विना पडुन आहे. त्यामुळे ही खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावीत अशी मागणी शेतकऱ्यांमधून व केन्द्र चालकातुन केली जात आहे. खरेदी केंद्र चालकांना केन्द्र सुरू करण्याबाबत कोणतीही सुचना किंवा आदेश प्राप्त न झाल्याने खरेदी केंद्राला कुलुप लावण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

SCROLL FOR NEXT