Latur : शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विष पिऊन केली आत्महत्या
Latur : शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विष पिऊन केली आत्महत्या दीपक क्षीरसागर
ऍग्रो वन

Latur : शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विष पिऊन केली आत्महत्या!

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूरच्या औसा तालुक्यातील नागरसोगा येथील 40 वर्षीय शेतकरी लालगिर माधवगिर गिरी यांनी (शुक्रवार १० सप्टेंबर) रोजी कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले होते. त्याने विष पिल्यानंतर शेजारी व घरच्या मंडळीनी त्यांना तात्काळ उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. सहा दिवस उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

हे देखील पहा :

नागरसोगा येथील लालगिर माधवगिर गिरी हे अल्पभूधारक शेतकरी होते व त्यांना १ हेक्टर ५३ आर जमीन आहे. अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर चालक म्हणून काम करीत होते. आठ दहा वर्षापासून ते पुणे येथे खाजगी गाडीवर चालक होते. पण कोरोना लॉकडाऊन नंतर ते गावात येऊन राहिले होते. त्यांच्यावर बँकेचे दोन लाख तर खाजगी एक ते दिड लाख असे साडेतीन ते चार लाख रुपये कर्ज झाले होते.

हे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत त्यांनी १० सप्टेंबर रोजी विष प्राशन केले होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. लातूर जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचा पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने नागरसोगा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Rate 4rd May 2024: वीकेंडला घराबाहेर पडताय? जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर

Mumbai News: कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोलीस तपासात चक्रावून टाकणारी माहिती उघड

Malshej Ghat Accident: मोठी बातमी! माळशेज घाटात भीषण अपघात; पती पत्नीसह चौघांचा मृत्यू

Baramati Constituency : पुणे शहरातील 13 दुय्यम निबंधक कार्यालये दोन दिवस राहणार बंद, जाणून घ्या कारण

Buldhana Water Crisis: बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा... ४६ गावांमध्ये ४७ टँकर सुरू; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

SCROLL FOR NEXT