Tomato Price Saam tv
ऍग्रो वन

Narayangaon Bajar samiti : टोमॅटोला हंगामातील उच्चांकी भाव; नारायणगाव उपबाजारात ७०० रुपयांपेक्षा जास्त दर

रोहिदास गाडगे

जुन्नर (पुणे) : सध्या बाजारात भाज्यांची आवक कमी झालेली आहे. यामुळे भाजीपाल्याचे दर देखील कडाडले आहेत. यात आता टोमॅटोला देखील चांगला दर मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जुन्नरच्या नारायणगाव उपबाजारात एका कॅरेटला ७०० रुपयांच्या वर उच्चांकी दर मिळत आहे.  

जुन्नर (Junnar) तालुक्यातील टोमँटोला उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात मागणी असुन लांबणीवर गेलेला पाऊस आणि टोमँटोची आवक कमी झाली आहे. दरम्यान नारायणगाव बाजार समितीत टोमँटोची आवक घटली असल्याने टोमँटोला आता उच्चांकी बाजारभाव मिळत आहे. एक नंबर (Tomato) टोमँटोच्या २० किलोच्या कॅरेटला मागील २ दिवसांपासून आणि आज सकाळी तब्बल ७०० पेक्षा जास्त दर मिळाला आहे. तर सरासरी हा भाव ६०० ते ९०० रुपये दर मिळत असल्याने शेतकरी आनंदी आहेत.

किरकोळ बाजारात दुप्पट झाले भाव  

बाजार समितीत (Bajar Samiti) टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने प्रति किलोला हा दर ४० ते ५० रुपये आहे. मागील दहा दिवसांपूर्वी किलोला हाच भाव २० ते २५ रुपये मिळत होता. आता टोमँटोला दुप्पटीने दर मिळत असला तरी टोमँटोची आवक घटलेली पहायला मिळत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Richest Marathi Actress: मराठी चित्रपटातल्या श्रीमंत सिनेतारका; सर्वाधिक मालमत्ता कोणाची?

Ladki Bahin Yojana : सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात किती पैसे येणार? महत्वाची अपटेड समोर

Maharashtra News Live Updates: - इम्तियाज जलील यांच्या तिरंगा रॅलीमुळे मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक ठप्प

Bharatshet Gogawale: अखेर भरत गोगावले अध्यक्ष बनले एसटीचे अध्यक्ष, 2 दिवसांच्या नाराजीनंतर स्वीकारला पदभार

Rajgad Fort : इतिहासाची उजळणी करायचीय? फक्त 'या' ठिकाणाला द्या भेट

SCROLL FOR NEXT