Mosambi Price Saam tv
ऍग्रो वन

Mosambi Price : जालना बाजार समितीत मोसंबीला २२ हजार रुपयांपर्यंत भाव; मागणी वाढल्याने आणखी भाव वाढीची शक्यता

Jalna News : जालना जिल्ह्यात मोसंबीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असते. त्याठिकाणची मोसंबी परराज्यात पाठविण्यात येत असते. सद्यस्थितीला मोसंबीच्या मागणीत वाढ झाल्याने दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: मोसंबीच्या आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील काही दिवसापासून मोसंबीच्या भावात चढ- उतार सुरू आहे. सद्यस्थितीला शेतकऱ्यांच्या मोसंबीला कमीत कमी १३ हजार रुपये तर २३ हजार रुपये टन असा दर मिळत आहे. यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. 

जालना जिल्ह्यात मोसंबीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असते. त्याठिकाणची मोसंबी परराज्यात पाठविण्यात येत असते. सद्यस्थितीला मोसंबीच्या मागणीत वाढ झाल्याने दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे. तसेच मागणी वाढत असल्याने दरात देखील आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

रोज १२० टन मोसंबीची आवक 

जालना जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मोसंबीचे उत्पादन निघत आहे. यामुळे जालना बाजार समितीत दररोज १०० ते १२० टन मोसंबीची आवक होत आहे. जालन्याची मोसंबी जयपूर, कोलकत्ता, दिल्ली या ठिकाणी पाठवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला भाव सद्यस्थितीला मिळत आहे. जालना बाजार समितीत जास्तीत जास्त भाव २३ हजार रुपये टन इतका मिळत आहे. 

आंध्र प्रदेशच्या मोसंबीची आवक वाढली 

उत्तर भारतातील मार्केटमध्ये आंध्र प्रदेशातील मोसंबीची आवक वाढ झाल्याने जिल्ह्यातून होणाऱ्या मोसंबीचे भाव आगामी काळात वाढण्याची शक्यता कमी आहे.आंध्र प्रदेशातून येणाऱ्या मोसंबीचे भाव हे जालन्यातील मोसंबी पेक्षा कमी असल्याने त्याचा परिणाम स्थानिक मोसंबीच्या भावावर पडत असल्यानं जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

SCROLL FOR NEXT