Jalna Temperature Saam tv
ऍग्रो वन

Jalna Temperature : जालन्यात तापमान ४२ अंशाच्या वर; सफरचंद बागेला फटका, उन्हाच्या तीव्रतेने फुल सुकली

Jalna News : सफरचंदाची लागवड करून यशस्वी प्रयोग करून दाखवला होता. मागील वर्षी एक लाख रुपयांचे उत्पन्न देखील सफरचंदाच्या बागेतून मिळालं होतं. यावर्षी मात्र बागेवर उन्हाचा परिणाम होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: उन्हाची तीव्रता आता दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेच्या फटका फळ बागांना बसण्यास सुरवात झाली आहे. यातच जालना जिल्ह्यात तापमान ४२ अंशाच्या वर गेले असल्याने याचा फटका सफरचंदच्या बागांना बसत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. उन्हामुळे फुलं सुकू लागली आहेत. तर लहान फळ देखील गळून पडत आहेत. यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत असल्याने बागेवर कुऱ्हाड चालविण्याची वेळ आली आहे.  

जालना जिल्ह्यातील मठ पिंपळगाव येथे सफरचंद बागेचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यावर बदलत्या वातावरणामुळे आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे. चार वर्षांपूर्वी मठ पिंपळगाव येथील शेतकरी कैलास जिगे यांनी सफरचंदाची लागवड करून यशस्वी प्रयोग करून दाखवला होता. त्यांना मागील वर्षी एक लाख रुपयांचे उत्पन्न देखील सफरचंदाच्या बागेतून मिळालं होतं. यावर्षी मात्र बागेवर उन्हाचा परिणाम होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

फुलं सुकू लागली 

यावर्षी बदलत्या वातावरणामुळे आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे सफरचंदाची फुल झाडावरच सुकून जात असून झाडाला लागलेले छोटे सफरचंद देखील उन्हाच्या तीव्रतेमुळे गळून पडत आहे. कैलास जीगे या शेतकऱ्याला मागच्या वर्षी सफरचंदाच्या बागेतून एक लाख रुपयाच उत्पन्न मिळालं होतं. मात्र यावर्षी उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि बदलत्या वातावरणामुळे लावलेला खर्च देखील या शेतकऱ्याचा वसूल होणार नाही.  

बागेवर कुऱ्हाड चालविण्याची तयारी 

जालना जिल्ह्यात सफरचंदचे उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. मात्र उन्हामुळे शेतकऱ्यापुढे संकट उभे राहिले आहे. कारण पुढील दिवसात उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून पाणी टंचाईची देखील समस्या आहे. यामुळे बागांना पुरेसे पाणी देता येणे शक्य नाही. यामुळे शेतकरी सफरचंदाच्या बागेवर कुऱ्हाड चालवण्याच्या तयारीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT