Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News : शेतीसाठी सोसायटीचे कर्ज काढले होते. तसेच काही जणांकडून हातउसनवारीने पैसे घेतले होते. मात्र शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने डोक्यावरील कर्ज कसे फेडायचे याची चिंता होती

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : सार्वे बु. (ता. पारोळा) येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात जात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. हि घटना १४ जूनला सकाळी उघडलीस आली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सार्वे बु. (ता. पारोळा) येथील संजय कृष्णा पाटील (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेती करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. त्यांनी शेतीसाठी सोसायटीचे कर्ज काढले होते. तसेच काही जणांकडून हातउसनवारीने पैसे घेतले होते. मात्र शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने डोक्यावरील कर्ज कसे फेडायचे याची चिंता होती. यातूनच त्यांनी १४ जूनला सकाळी त्यांच्या (Farmer) शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 

हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तत्काळ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथून धुळे येथे नेण्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र दुपारी १ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान सदर घटनेची नोंद पारोळा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure : BP नियंत्रणात ठेवायचा आहे? मग पाणी पिण्याच्या या 7 गोष्टी अजिबात दुर्लक्षित करू नका

Mumbai AC Local Train: लोकलचं AC बंद, प्रवासी गुदमरले; आता लोकलच्या आतही मृत्यूची भीती?

Amir Khan Marriage: आमिर खान लव जिहादचा ब्रँड अम्बेसेडर; तिसऱ्या लग्नावरून वाद उफाळला

कॉकरोच आंदोलन उधळण्याचा कट कुणाचा? अभिजीत दिपकेंच्या पोस्टनंतर ठाकरेंचाही दावा

Pune Weather Update: पाऊस येणार की नाही? कसं असेल हवामान? हवामान विभागाने वर्तवला पुढील चार दिवसांचा अंदाज

SCROLL FOR NEXT