Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Parola News : घरातून कोणालाही न सांगता गेले; नापिकी, कर्जाच्या बोजातून शेतकऱ्याने संपविले जीवन

Jalgaon News : दोन बिघे जमीन आहे, त्यात यंदा कापसाच्या पिकाची लागवड केली होती. अतिपावसाने पीक खराब झाली आहे.

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : मागील काही वर्षात शेतीसाठी काढलेले कर्ज वाढतच आहेत. यात सततची नापिकी व अतिपावसामुळे यंदा देखील उत्पन्न हातातून जाण्याची शक्यता आहे. यामुळे कर्ज कसे फेडायचे; या विवंचनेत शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना २२ सप्टेंबरला दुपारी उघडकीस आली. 

पारोळा (Parola) तालुक्यातील हिरापूर येथील शेतकरी महेंद्र विनायक सोनवणे (वय ३८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे दोन बिघे जमीन आहे, त्यात यंदा कापसाच्या पिकाची लागवड केली होती. अतिपावसाने पीक खराब झाली आहे. त्यातच आठ दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांनी काढलेले बँकेचे पीककर्ज भरण्याची नोटीस आली होती, सततची नापिकी व येणाऱ्या उत्पन्नाचा सोर्स नसल्याने, हात उसनवार व सरकारी बँकांचे झालेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेत महेंद्र असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. 

चपलांवरून लागला तपास 

सकाळी घरी कोणाला काही न सांगता महेंद्र हे घरातून निघून गेले. मात्र दुपारपर्यंत घरी न आल्याने परिवारातील सदस्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास हिरापूर शिवारातील दत्तात्रेय पाटील यांच्या विहिरीजवळ त्यांच्या चपला आढळून आल्या. गावातील हिलाल श्रावण भील, अशोक रुमाल भील यांनी विहिरीत उतरून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पारोळा पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगडमध्ये दाखल

Cardio Workout at Home: घरच्या घरी करा कार्डिओ वर्कआउट; फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी या ७ एक्सरसाइज बेस्ट

Goregaon Mulund Link Road: दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी आता सुसाट जा, फ्लायओव्हर या दिवशी होणार सुरू; गोरेगाव मुलुंड लिंकरोडवर मोठी अपडेट

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी मेहनत करूनही फरक दिसत नाही? नकळत होणाऱ्या 'या' चुका पडू शकतात महागात

SCROLL FOR NEXT