Farmer Cotton Crop Saam tv
ऍग्रो वन

रानडुकरांच्या धुडघुसीत कपाशी पिक उध्वस्त

रान डुकरांच्या धुडघुसीत कपाशी पिक उध्वस्त

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कुऱ्हा काकोडा (ता. मुक्ताईनगर) येथून जवळ असलेल्या राजूरा शिवारातील शेतात रान डुकरांच्या टोळक्याने हाता तोंडाशी आलेल्या कपाशीच्या (Cotton) पिकात धुडगूस घालून मोठ्याप्रमाणात नुकसान केले. यामुळे शेतकरी (Farmer) हतबल झाला असून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. (Jalgaon News Farmer Loss Cotton)

कुऱ्हा- वढोदा परिसरातील शेत शिवाराला (Jalgaon) वढोदा वनपरिक्षेत्राच्या जंगलाचा विळखा आहे. जंगलातील वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात शेती शिवाराताच असतात. त्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. मात्र याबाबत वनविभाग (Forest Department) तोडकी नुकसान भरपाई देते तेही सहा- सात महिने विलंब लावून. मंगळवारी रात्री राजूरा शेती शिवारातील गट नंबर ४१/१ अलकाबाई रामसिंग मोहिते यांच्या शेतातील कपाशीचे पिक आहे. कपाशीला कैर्या सुध्दा लागलेल्या आहेत. मात्र रानटी डुकरांनी हैदोस घालून कपाशी अक्षरशः उपटून फेकल्या आणि ठिकठिकाणी गंजचे गंज तयार केले. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पंचनामा करून मदत द्या

रान डुकरांमुळे तब्बल चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी संजय रामसिंग मोहिते यांनी सांगीतले. तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी होत आहे. अश्याच प्रकारे कुऱ्हा काकोडा परिसरातील शेत शिवारात शेतीचे नुकसान वन्य प्राण्यांकडुन होते. मात्र वन विभागात वेगवेगळे नियम, निकष लावून तुटपुंजी मदत देत असल्याने तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : शरद पवार राजकारणातील महामेरू - संजय राऊत

Viral Video: आवाजावरून दोन गट एकमेकांना भिडले, हातात काठ्या आणि तलवारी घेऊन जोरदार राडा; पाहा VIDEO

IPL 2025 Auction साठी 1574 खेळाडूंनी नोंदवलं नाव! केव्हा, कुठे आणि कधी होणार ऑक्शन? जाणून घ्या

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृताच्या घरी नवीन पाहुणा कधी येणार? प्रेग्नेंसीबाबत दिली महत्त्वाची अपडेट

US Election Result 2024: डोनाल्ड ट्रम्प Vs कमला हॅरिस, आतापर्यंत कोणत्या राज्यात कोण विजयी?

SCROLL FOR NEXT