पावसाळी वातावरण 
ऍग्रो वन

जळगाव जिल्‍ह्यात पावसाळी वातावरण; जोरदार वाऱ्याने दादर पडली

जळगाव जिल्‍ह्यात पावसाळी वातावरण; जोरदार वाऱ्याने दादर पडली

Rajesh Sonwane

जळगाव : हवामान विभागाच्‍या अंदाजानुसार राज्‍यात अनेक ठिकाणी पाऊस व गारपीट झाली. त्‍यानुसार खानदेशात देखील मंगळवारी (२८ डिसेंबर) ढगाळ वातावरण होवून जोरदार वारे वाहू लागले. यामुळे निसवणीला आलेली दादर आडवी झाली आहे. शिवाय पावसाळी वातावरण तयार झाले असून, शेतकरी चिंतेत पडला आहे. (jalgaon-news-Rainy-weather-in-Jalgaon-district-A-strong-wind-blew)

राज्यातील अनेक भागात मंगळवारी गारपीटसह पाऊस (Rain) झाला. मात्र खानदेशात कुठेही पाऊस झाला नाही. दुपारी मात्र जोरदार वारा सुटला. यात दादर ज्वारी आडवी होवून पिकाचे नुकसान झाले आहे. ऑक्टोबरमध्ये पेरलेली ज्वारी निसवणीवर आहे. या ज्वारीची वाढ सात ते नऊ फूट एवढी झाली आहे. कोरडवाहू क्षेत्रात पीक आडवे झाले असून, शेतकरी चिंतेत आहेत.

वाऱ्यामुळे गारवा

दादर ज्वारीची पेरणी जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात चोपडा, अमळनेर, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव आदी भागात अधिक झाली आहे. तसेच धुळ्यात (Dhule) शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारात (Nandurbar) शहादा भागात अधिकची दादर ज्वारी आहे. मंगळवारी रात्री ढगाळ व थंड वातावरण होते. आज सकाळपासूनच वारा असून ढगाळ वातावरण आहे. जोरदार वाऱ्यामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Crime : अमरावतीत फ्लॅटमध्ये सुरु होता देहविक्रचा व्यवसाय; बनावट ग्राहक पाठवून पर्दाफाश, महिलेसह पाच तरुणी ताब्यात

Maharashtra Live News Update: अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 29,327 हेक्टर क्षेत्रावर नुकसान

अंगावर काटा आणणारी घटना, शेतकऱ्याने २ मुलांना अंगणात संपवलं, त्यानंतर कुटुंबासह पेटवून घेतलं, ६ जणांचा मृत्यू

Crime News: आत्या आणि पुतण्यांच्या प्रेमाचा भयानक शेवट, झाडाला लटकलेले आढळले मृतदेह

India's Richest Person: अब्जाधिशांच्या यादीत 'किंग'ची एन्ट्री, शाहरूख खानची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT