Heavy Rain
Heavy Rain Saam tv
ऍग्रो वन

Rain: वादळी पावसामुळे पिकांना फटका; बळीराजाचे नुकसान

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : तामसवाडी मंडळातील ढोली बोळे, वेल्हाणे, तामसवाडी व कराडी परिसरात रविवारी (4 सप्‍टेंबर) सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसामुळे (Heavy Rain) कापूस पिकासह इतर पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांचे (Farmer) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Jalgaon News Heavy Rain)

गेल्या काही दिवसांपासून उघडीप मिळालेल्या पावसाने (Rain) तालुक्यातील अनेक ठिकाणी जोरदार आगमन झाले. मात्र तामसवाडी मंडळात वादळी पावसामुळे रस्त्यावरील झाडे कोलमडली. याबरोबर शेतातील (Cotton) कपाशी पिकांसह इतर पिके पावसामुळे जमिनीवर आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सायंकाळच्या पावसामुळे शेतकऱ्यांसह मजूर वर्ग यांची एकदम धावपळ उडाली.

पंचनाम्‍याची मागणी

ढोली येथील शेतकरी संजय राजाराम पाटील, किरण गुमान पाटील, दीपक संतोष पाटील, मदन रामदास पाटील, पांडुरंग छबुलाल पाटील, लोटन वामन पाटील यांच्या पिकांचे नुकसान झाले असून कृषी विभाग व महसूल विभागाने परिसराची पाहणी करून पंचनामे करावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Cholesterol Level: उच्च कोलेस्ट्रॉलमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, मग आहारात करा बदल

IIM Mumbai Recruitment 2024 : नोकरीची सुवर्णसंधी! मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये भरती, जाणून घ्या पात्रता आणि अटी

Loksabha Election: नगरमध्ये महाविकास आघाडीत फूट! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा सुजय विखेंना पाठिंबा; निलेश लंकेंना बालेकिल्ल्यात धक्का

Maharashtra Weather Forecast: पुणे, ठाणे आणि रायगडसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीची शक्यता

Delhi School Bomb Threat: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी प्रकरण, दिल्ली सरकारने शिक्षकांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

SCROLL FOR NEXT