Farmer Suicide Saam tv
ऍग्रो वन

Suicide: नापिकी, कर्जाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकी, कर्जाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

एरंडोल (जळगाव) : सततची नापिकी, पावसामुळे कापूस आणि कांद्याचे नुकसान झाल्यामुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत खडकी बु. (ता. एरंडोल) येथील वयोवृद्ध शेतकऱ्याने (Farmer) आज पहाटेच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली. (jalgaon news-old farmer commits suicide due to debt)

खडकी बु. (Erandol) येथील हिम्मत फकीरा पाटील (वय ६०) यांची कोरडवाहू शेती होती. त्याचेवर विविध कार्यकारी सोसायटीचे पन्‍नास हजार रुपये व खाजगी सावकाराचे कर्ज होते. सततची नापिकी, पावसामुळे कपाशी आणि कांद्याचे झालेल्या नुकसानीमुळे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेत ते होते. तसेच पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या दोन म्हशी मरण पावल्यामुळे (farmer Suicide) त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचे देखील निधन झाल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले होते.

पहाटेच उचलले टोकाचे पाऊल

आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास हिम्मत पाटील यांनी राहत्या घरातच गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केली. सकाळी सहा वाजेच्या सुमारास जितेंद्र पाटील यांना वडील हिम्मत पाटील यांनी गळफास घेतल्याचे दिसून आल्यामुळे त्यांनी गावातच राहत असलेल्या चुलत भाऊ भरत संतोष पाटील यांना माहिती दिली. सुनील सुकलाल पाटील, जितेंद्र पाटील, भरत पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने हिम्मत पाटील याना ग्रामीण रुग्णालयात (Hospital) आणले असता ते मयत झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. मयत हिम्मत पाटील यांचे पश्‍चात पत्नी, एक विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, जावई, सुना असा परिवार आहे. याबाबत भरत संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार काशिनाथ पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gambhir: वनडे सिरीज जिंकल्यानंतर विराट-रोहितबद्दल काय म्हणाला गौतम गंभीर? IPL टीमच्या मालकांनाही सुनावले खडे बोल

Maharashtra Live News Update: सक्षम ताटे खून प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयीन कोठडी

Right To Disconnect 2025 Act : "कर्मचाऱ्यांना ऑफीसनंतर नो कॉल, नो ईमेल" संसदेत विधेयक मांडलं; वाचा सविस्तर

बीडमध्ये भयंकर घडलं; ग्रामपंचायत शिपायाला काळंनिळं होईपर्यंत मारलं, महिलेची छेड काढल्याचा आरोप

Dhurandhar Collection : जगभरात 'धुरंधर'ची धूम; दुसऱ्या दिवशी मोडला मोठा रेकॉर्ड, रणवीर सिंहच्या चित्रपटाने किती कमावले?

SCROLL FOR NEXT