Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : दीड महिन्यावर मुलीचे लग्न अन् वडिलांनी मृत्यूला कवटाळलं; टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण धक्कादायक

Jalgaon News : रवींद्र पाटील हे पत्नी, मुलगा आणि दोन मुली यांच्यासह वास्तव्याला होते. शेती करून ते उदरनिर्वाह करीत होते.

Rajesh Sonwane

जळगाव : घरात दीड महिन्यावर मुलीचा लग्न सोहळा असल्याने आनंदाचे वातावरण होते. याच दरम्यान शेतकरी पित्याने कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याने विषारी द्रव्य सेवन केले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील भांडली येथे घडली आहे. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

जळगाव (Jalgaon News) तालुक्यातील भादली येथील रवींद्र कौतिक पाटील (वय ५८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. रवींद्र पाटील हे पत्नी, मुलगा आणि दोन मुली यांच्यासह वास्तव्याला होते. शेती करून ते उदरनिर्वाह करीत होते. मागील दोन ते तीन वर्षांपासून शेतात सततची नापिकी येत होती. यात सोसायटीचे कर्ज, उत्पन्न मर्यादित आणि कर्जाची मागणी करणारे थांबेनात, म्हणून कर्जबाजारीला कंटाळून रवींद्र पाटील यांनी २६ ऑक्टोम्बरला शेतात पिकांवर फवारणीचे विषारी औषध प्राशन केले. ही बाब नातेवाइकांच्या (Farmer) लक्षात आल्यानंतर तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना दाखल केले. मात्र उपचारादरम्यान ३० ऑक्टोम्बरला त्यांचा मृत्यू झाला. 

दीड महिन्यात मुलीचे लग्न
रवींद्र पाटील यांच्या मुलीचे लग्न ठरले होते. डिड महिन्यानंतर म्हणजे २२ डिसेंबरला लग्न होणार होते. एकीकडे मुलीचे लग्न ठरल्याने घरात आनंदाचे वातावरण होते, तर दुसरीकडे रवींद्र पाटील यांच्यावर आर्थिक अडचणींमुळे दबाव वाढत होता. दुहेरी विवंचनेत त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त होत असून, अवघ्या दीड महिने लग्नाला शिल्लक असताना, शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT