Farmer Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

कापसाला जळगावात मिळाला उच्‍चांकी १६ हजार भाव; बळीराजा आनंदी

बळीराजाला बाप्‍पा पावला; कापसाला मिळाला उच्‍चांकी १६ हजार भाव

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झाली. दरम्‍यान (Ganesh Chaturthi) चतुर्थीच्‍या मुहूर्तावर उच्‍चांकी १६ हजार रूपये प्रतिक्‍वींटल इतका दर मिळाला आहे. यामुळे बळीराजामध्‍ये (Farmer) आनंदाचे वातावरण आहे. (Jalgaon News Cotton purchase begins)

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदील सुरवात होत असते. त्‍यानुसार (Jalgaon) जळगाव जिल्‍ह्यात देखील सुरवात झाली आहे. या मुहूर्तावर बोदवड (Bodwad) येथे कापसाला १६ हजार रुपये, तर सातगाव डोंगरी (ता. पाचोरा) येथे १४ हजार ७७२ रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला आहे. बोदवड तालुक्यात बुधवारी कापूस (Cotton) खरेदीचा श्रीगणेशा करण्यात आला. वैष्णवी ट्रेडर्सचे संचालक राजू वैष्णव यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला. त्यात १६ हजारांचा भाव दिला.

दहा हजाराच्‍या वरच दर

जिल्‍ह्यातील बहुतांश ठिकाणी कापूस खरेदीला सुरवात झाली. यात सर्वच ठिकाणी दहा हजार रूपयांच्‍या वर दर मिळाला आहे. यामध्‍ये सातगाव डोंगरी येथील व्यापारी बाळू शंकर वाघ आणि ज्ञानेश्वर शंकर अमृतकर यांनी १४ हजार ७७२ रुपये, खेतिया येथे यंदाच्या हंगामातील पहिल्या कापूस खरेदीला १० हजार ७०१ रुपये भाव मिळाला. तर वडाळी (ता. शहादा) येथील शेतकरी भरत पाटील यांच्या कापसाला शुभ मुहूर्त भाव १० हजार ७०१ रुपये क्विंटल देण्यात आला. धरणगाव येथे श्री जिनिंगमध्ये मुहूर्ताला ११ हजार १५३ रुपये असा भाव मिळाला. येथे एक हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhendi Bhaji Recipe: हिरवी मिरची टाकून भेंडीची भाजी कशी बनवायची?

New Year Trip 2026 : नवीन वर्षात 'ही' 8 ठिकाणं नक्की फिरा, गर्दी-गोंधळापासून दूर शांतता अनुभवाल

20-25 हजारांमध्ये मुली मिळतात; भाजप मंत्र्यांच्या पतीने अकलेचे तारे तोडले, VIDEO

एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा भीमाशंकर मंदिरात राडा, पुजाऱ्याला लाथा बुक्यांनी मारहाण|VIDEO

Sunday Megablock : मध्य रेल्वेचा रविवारी कडकडीत मेगाब्लॉक! ट्रान्स हार्बरवर हालहाल होणार, कुठून कुठे अन् कसं असेल वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT