Banana Saam tv
ऍग्रो वन

केळीला फळाचा दर्जा; रावेरला काढली केळी घडाची मिरवणूक

केळीला फळाचा दर्जा; रावेरला काढली केळी घडाची मिरवणूक

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : केळीला फळाचा दर्जा मिळाल्याबद्दल रावेर तालुका महाविकास आघाडीतर्फे शहरातून वाजतगाजत केळीच्या घडाची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) अभिनंदनाच्या ठरावाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. (jalgaon news Banana fruit quality Raver removed the banana bunch procession)

माजी आमदार अरुण पाटील यांच्या संपर्क कार्यालयापासून सजवलेल्या हातगाडीवर केळीचे (Banana) घड, दर्शनी भागात केळीला फळाचा दर्जा मिळवून देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे अभिनंदनाचे बॅनर लावून ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. केळीला फळाचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल महाविकास आघाडीचा व मुख्यमंत्री यांच्यासह मंत्र्यांचा जयघोष करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मिरवणूक तहसील कार्यालयावर आली.

अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण

केळीला फळाचा दर्जा देण्याबाबत भाजपच्या (BJP) वल्गनाच ठरल्या, तर महाविकास आघाडी सरकारने केळीला फळाचा दर्जा देऊन शेतकऱ्यांना (Farmer) न्याय देऊन अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, अटवाडे येथील शेतकरी आर. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हिताच्या चांगल्या योजना जाहीर केल्या. यात कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ७५ हजार रुपये अनुदान, तसेच केळीला फळाचा दर्जा स्वरूपात रोजगार हमी योजनेत समाविष्ट करून शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, फलोत्पादनमंत्री यांना पाठविण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक प्रशासनाची घरावर धाड; शिंदे गटाच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

Tuesday Horoscope : तुमचा जवळचा मित्र विश्वासघात करण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावा लागेल

दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स; शिंदेंचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल|VIDEO

CM फडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न; शिवतीर्थावरून ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल, VIDEO

मलाईवरुन मुंबई तापली, मुंबईत येतो, पाय छाटून दाखवा

SCROLL FOR NEXT