Jalgaon News Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

पिक विमाबाबत जनजागृती रथयात्रेस प्रारंभ; मंगळग्रह सेवा संस्थेचा उपक्रम

पिक विमाबाबत जनजागृती रथयात्रेस प्रारंभ; मंगळग्रह सेवा संस्थेचा उपक्रम

संजय महाजन

अमळनेर (जळगाव) : येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मंगळग्रह पिक विमा जनजागृती रथ तालुक्यातील ग्रामीण भागात पिक विमाबाबत जनजागृती करण्यासाठी मंदिरातून रवाना झाला आहे. दहा दिवसांत तालुक्यातील १५४ गावांमध्ये हा रथ पीक विमा (Crop Insurance) बाबत जनजागृती करणार आहे. (Jalgaon News Crop Insurance)

अमळनेर (Amalner) येथील प्रसिद्धी मंगळग्रह मंदिर संस्‍थानतर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले व तालुक्यातील हिंगोणे बु. येथील प्रगतीशील शेतकरी (Farmer) अजयसिंग पाटील यांनी रथाचे विधिवत पूजन केले. संस्थेचे खजिनदार गिरीश कुलकर्णी व कृषी विभागाचे दीपक चौधरी यांनी श्री मंगळदेव ग्रह मंदिराचा भगवा ध्वज दाखवून रथाला चालना दिली. रथाची काही अंतरापर्यंत सवाद्य मिरवणूक (Jalgaon News) काढण्यात आली. संस्थेतर्फे दरवर्षी शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ तथा मार्गदर्शनार्थ अनेकवीध कार्यक्रम राबविले जातात. हा उपक्रम त्याचाच एक भाग आहे.

शेतकऱ्यांमध्‍ये जनजागर

पीक विमाविषयी अजूनही शेतकऱ्यांमध्ये फारसा जनजागर नाही. पीक विम्याच्या फायद्यांबाबत त्यांना फारशी माहिती नाही. शेतकऱ्यांना ही माहिती व्हावी; दुर्दैवाने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्यांना त्याची भरपाई मिळावी, यासाठी जनसेवार्थ हा रथ रवाना झाला आहे. रेकॉर्डेड माहिती, बॅनर व पॉम्प्लेटच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ; तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

Mint-Lemon Juice For Liver Health: लिव्हरच्या आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक, आठवड्यातून 2 वेळा प्यायल्यास होईल फायदा

Shardiya Navratri 2026 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमी कधी आहे? तिथीमुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT