Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

Jalgaon News : पती- पत्नी शेती करून उदरनिर्वाह करीत होते. नेहमीप्रमाणे पती- पत्नी १७ ऑक्टोम्बरला शेतात गेले होते.

Rajesh Sonwane

जळगाव : पाऊस गेल्यानंतर शेतातील कामांना वेग आला आहे. अशाच प्रकारे शेतात काम करणाऱ्या शेतकरी दाम्पत्यावर मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची पत्नी जखमी झाली आहे. सदरची घटना जळगाव तालुक्यातील  वडली शिवारात घडली. 

जळगाव (Jalgaon) तालुक्यातील वडली येथील विकास चूडामण पाटील (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. विकास पाटील यांचे वडली शिवारातच शेती असून, पती- पत्नी शेती करून उदरनिर्वाह करीत होते. (Farmer) नेहमीप्रमाणे पती- पत्नी १७ ऑक्टोम्बरला शेतात गेले होते. शेतात काम करीत असताना सकाळी दहा ते अकराच्या सुमारास मधमाश्‍यांचे मोहोळ उठले आणि त्यांनी विकास पाटील व त्यांची पत्नी रत्‍नाबाई पाटील (वय ५०) यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या हल्ल्याने घायाळ पती-पत्नी जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावत सुटले.

घडल्या प्रकाराची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मदतीला धाव घेतली. मात्र तोपर्यंत मधमाश्यांच्या हल्ल्यात दोघेजण बेशुद्ध झाले होते. बेशुद्धावस्थेत पडलेल्या जखमी पती-पत्नीला खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून विकास पाटील यांना मृत घोषित केले. तर रत्‍नाबाई पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

Hardik Pandya: मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्यामध्ये बिनसलं? काय आहे नेमकं सत्य, वाचा

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

Shani Jayanti 2026: शनी जयंतीला होणार बुध-शुक्राचं गोचर; या राशींना मिळणार पैसाच पैसा

मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT